नवीन लेखन...

भरताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यकाळ : २६ जानेवारी १९५० ते १२ मे १९६२

स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पेशाने वकील होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हनून निवड केली गेली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १२ वर्षे राष्ट्रपतिपदाचा कार्यबार सांभाळला.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे वडील महादेव सहाय हे संस्कृत व फारशीचे अभ्यासक होते. पाच वर्षांचे असतानाच मौलानांकडून राजेंद्र प्रसाद यांनी फारशीचा अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी छपरा येथे पाठविण्यात आले.

त्यांनी पाटणा येथील टी. के. घोष अकादमीत शिक्षण घेतले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १८ व्या वर्षी कोलकाता विश्वविद्यालयाची प्रवेश परीक्षा दिली आणि त्यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी १९०२ मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९१५ साली त्यांनी विधिज्ज्ञ म्हणजे विकिलीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले त्याबद्दल ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर त्यांनी विधीशास्त्रात डॉक्टरेटही मिळवली.

1 Comment on भरताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..