७ जुलै १९२८ रोजी स्लाइस्ड ब्रेड बाजारात विक्रीस प्रथम उपलब्ध झाला.
ब्रेड हा पारंपरिक पाश्चिमात्य आहाराचा अविभाज्य भाग आहे. पण त्यातदेखील अमेरिका, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका संस्कृतीमध्ये ब्रेड हे रोजचे अन्न आहे. सध्या अनेक प्रकारचे ब्रेड उपलब्ध आहेत.
मुळात ब्रेड हा पदार्थ आला इजिप्त मधून. पहिल्यांदा इजिप्तने ब्रेड बनवल्याचं क्रेडिट जगाने इजिप्तला दिलंय. साधारण इसवीसनपूर्व ८ हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रेड बनवला गेला. त्यानंतर रोम आणि मग युरोपात ब्रेड पोचला.
युरोपात इंग्लंडमधे साधारण इसवीसनपूर्व ४५० मधे बनवला गेला. मध्ययुगात इंग्लंडमधे ब्रेड बेक करणं हे स्टेटस सिम्बॉल बनलं. तिकडचे श्रीमंत लोक पांढराशुभ्र ब्रेड खात. जो मैद्यापासून बनवला जातो. तर मध्यम वर्गीय आणि गरीब लोक कोंड्याचा किंवा रे या खालच्या स्तरातल्या गव्हाचा ब्रेड खात. त्यावेळी ब्रेडचा लोफ बनवला जात नव्हता. आपल्या भाकरीसारखा पण जाड ब्रेड असे. आणि ब्रेडला ट्रेन्चर असं म्हणत
२० व्या शतकात ब्रेडमधे भरपूर बदल झाले. आणि आधुनिक बेकिंगची पद्धत आली. मशिन आल्या. ब्रेडमधे यीस्ट, केमिकल वापरलं जाऊ लागलं. ज्यासध्याच्या काळात मुळे ब्रेड मऊ, लुसलुशीत, हलका आणि जाळीदार झाला.
भारतात सुफी संगीतकार आणि कवी आमिर खुसरो यांच्या लेखनात पहिल्यांदा ब्रेडचा उल्लेख आढळला. मुघलांच्या राज्य काळात ब्रेडचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पण हा ब्रेड मिडल ईस्ट म्हणजे इजिप्तवरुन आला होता. त्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज आल्यावर पुन्हा ब्रेडमधे फरक पडला. यासाठी आपण गोव्यातल्या ब्रेडची तुलना मुंबईतल्या ब्रेडशी केली पाहिजे. कारण गोव्यातल्या ब्रेडवर पोर्तुगीज पद्धतीच्या ब्रेडचा प्रभाव आहे तर मुंबईच्या ब्रेडवर ब्रिटीश ब्रेडचा. यामुळे चवीतही फरक पडतो. आजही मुंबई, गोव्यातला जुन्या लोकल बेकरीमधे जुन्या पद्धतीत ब्रेड बेक केला जातो., ही माहिती लॉस्ट रेसिपीज या पुस्तकातून आपल्याला मिळते.
भारतात स्लाइस्ड आणि आवरणात गुंडाळलेला ब्रेड प्रथमच विकण्याचं श्रेय ब्रिटानिया कंपनीला जातं. १९५४ साली दिल्लीत ब्रेडचं उत्पादन सुरू झाले. टांझानिया, आशिया आणि सब सहारण आफ्रिकेतील अनेक देशांमधील मुलांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी टांझानियातील एका खासगी कंपनीने केशरी रंगाचा गर असलेल्या रताळ्यापासून ब्रेडची निर्मिती केली आहे.
फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रिअल ब्रेड वीक’ म्हणजेच भेसळमुक्त पाव आठवडा म्हणून साजरा केला जातो. जे नैसर्गिक पद्धतीने ब्रेड बनवतात, अशांसाठी हा आठवडा खास साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply