नवीन लेखन...

विच्छा माझी पुरी करा नाटकाचा पहिला प्रयोग

२१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबी तलाव येथील रंगभवन येथे झाला.

वसंत सबनीस यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती होती. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी ‌अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.

गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा’ ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने ‘विच्छा माझी पुरी करा’चे प्रयोग करत होते.

‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.

आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु “विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५५ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

 

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..