नवीन लेखन...

तिबोटी खंड्या

रायगड जिल्ह्याचा ” जिल्हा पक्षी ” म्हणून नुकताच जाहीर झालेला.
२०२०च्या सप्टेंबरमध्ये भर पावसात फार्म जवळच राहणाऱ्या , विविध दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवासाची आणि सवयींची भरपूर माहिती असलेल्या समाधान पवार या तरूणाबरोबर कर्नाळ्याचे जंगल तुडवत ,निसरड्या वाटांवरून तोल आणि पाण्यापासून कॅमेरा सावरत या पक्षाच्या घरट्यासमोर पोचलो. याचे घरटे मातीचा उभा बंधारा किंवा डोंगराच्या उभ्या उतारावर बिळात असते. कॅमेरा तयार ठेऊन अडोशामागून निसर्गाच्या या अतिसुंदर कलाकृतीची वाट पाहत होतो. काही क्षणातच तोंडात पिल्लांसाठी भक्ष्य घेऊन ही नीळी पिवळी ज्योत समोर ठाकली. पोझ दिल्यासारखी थांबून सूर मारून एका क्षणात बिळात गडप झाली आणि काही सेकंदात पुन्हा वेगात बाहेर पडली.
बिळात आणले जाणारे भक्ष्य सुरवातीला लहान लहान किडे , चतुर , टोळ असे असते. पिल्ले जसजशी मोठी होतात तसतसं मोठ्या आकाराचे भक्ष्य आणले जाते. नर मादी दोघेही विना खंड , पिल्लांसाठी खाणे आणत असतात.
आम्ही गेलो तो दिवस पिल्लांचा एकोणीस / विसावा असावा. भक्ष्याच्या आकारावरूनही पिल्ले मोठी झाल्याचा अंदाज येत होता नशीबात असेल तर घरट्या
बाहेर प्रथमच आलेल्या पिल्लाचा फोटो काढण्याची संधी मिळेल या आशेने जोर धरला. आणि काय आश्चर्य …! घरट्याच्या बिळाच्या तोंडाशी निळसर पिवळी चोच डोकाऊ लागली. प्रथमच बाहेरचे जग पाहणारे बावरलेले डोळे दिसले. कॅमेरा फोकस करेपर्यंत बाळराजे पहिल्यावहिल्या उड्डाणात आमच्या समोरच येऊन बसले. आईवडिलांनी तात्काळ वरच्या फांदीवर येऊन त्याला साद घातली. आणि ती जोडी झाडांमागे गेली. आईवडिलांच्या मागोमाग पिल्लूही गेले. असं म्हणतात की बाहेर पडल्याबरोबर आईवडील पिल्लाला एखादे भक्ष्य दाखवतात. त्याने ते बरोबर उचलले की त्याला त्याच्या बळावर मोकळ्या जगात सोडून आपला त्याच्याशी संबंध तिथेच संपवतात.
Indeed it was a blessed day that offered me a chance to click an ODKF chick , moments after it fledged out.
-–अजित देशमुख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..