फुटबॉलपटू लियोनल मेस्सी यांचा जन्म २४ जून १९८७ रोजी झाला.
जगातील सर्वात महागडा आणि चर्चित फुटबॉलर लियोनल मेस्सीला पेले आणि मेरेडोनाच्या तोडीचा फुटबॉलर मानले जाते. लियोनेल मेसीचा जन्म स्पेनच्या रोसेरिया येथे झाला. लहानपणापासून पायावर बॉलला नाचवणाऱ्या मेसीने २००३-०४ मध्ये बार्सिलोना क्लबमध्ये ज्युनियर लेव्हलला खेळण्यास सुरूवात केली होती.१६ ऑक्टोबर २००४ ला मेसीने केवळ १७ वर्षे आणि ११४ दिवसाचा असताना क्लबच्या सिनियर लेव्हलच्या टीममध्ये जागा मिळवली. या वयात टीममध्ये सामील होणारा तो तिसरा खेळाडू ठरला होता. त्यानंतर प्रत्येक हंगामात तो नव-नवे किर्तीमान रचत गेला. २००४ मध्येच मेसीचा अर्जेंटीना आणि स्पनेच्या अंडर-२० संघात समावेश करण्याची संधी मिळाली. अर्जेंटीना टीमला प्राथमिकता देत मेसीने २००५ च्या फिफा यूथ वर्ल्ड कपमध्ये गोल्डन कपचा किताब जिंकला. अर्जेंटीनासाठी मेसीने १७ ऑगस्ट २००५ मध्ये पर्दापण केले. २०१९ मध्ये लियोनल मेसीने सलग सहाव्या वर्षी ५० गोल करण्याचा किर्तीमान रचला आहे.
मागील १० वर्षामध्ये ही ९ वी वेळ आहे, जेव्हा मेसीने एका वर्षात ५०+ गोल केले आहेत. याला अपवाद ठरले २०१३ चे वर्ष, तेव्हा मेसीने ४५ गोल केले होते. त्याने २०१२ मध्ये ४७ सामन्यात सर्वात जास्त ९१ गोल गेले होते. मेसीने आतापर्यंत ४४३ सामन्यात ६८८ गोल केले आहेत.
२०१९ मध्ये लिओनेल मेसी सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला आहे. २०१९ मध्ये कमाई मध्ये अर्जेंटीनाचा फुटबॉलर लियोनेल मेस्सी प्रथमच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने गेल्या वर्षभरात तब्बल ८८१.७२ कोटी (१२.७ कोटी डॉलर) एवढी कमाई केली.
लिओनेल मेस्सीने २०१७ मध्ये आपली लाँग टाईम गर्लफ्रेंड एंटोनिला रोकुजो सोबत लग्न केले. पण एंटोनिला हिला लग्नाच्या आधीच मेस्सीपासून दोन मुले झाली आहेत. एंटोनिला फुटबॉलपटू मेस्सीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी मॉडेलिंग करायची. लिओनेल मेस्सीने एंटोनिलासोबत अफेअर असल्याचे मान्य करण्याआधीच तिने आपले मॉडेलिंगमधील करिअर सोडले होते. करोनाच्या काळात लिओनल मेसीने आपला दिलदारपणा दाखवून दिला आहे. बार्सिलोना क्लबकडून मिळणाऱ्या मानधनातील ७० टक्के मानधनाची रक्कम करोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय मेसी स्वत:च्या मानधनातील ३५४ कोटींची रक्कम मदत म्हणून देणार आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply