हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे. म्हणूनच “सर सलामत, तो पगडी पचास” अशा म्हणी प्रचारात आल्या. शालेय वयात काय किंवा पुढेही आयुष्यभर, बौद्धिक क्षमता श्रेष्ठ असणे अनिवार्य आहे. एकंदरीत सर्वच दृष्टीने ‘बुद्धी’ हा मानवासाठी एक मोलाचा ठेवा आहे. उतार वयात डिमेंशिया, अल्झायमर्स डिसीज होण्याची भीती अधिकच असते. अशा मेंदूच्या स्वास्थ्यासाठी आपण काय करतो???? ह्या विषयाचं महत्वपटलं असेल तर आता उपाय समजून घेऊया.
मेंदूची जडण-घडण होण्यात ८५% सहभाग स्निग्ध पदार्थांचा असतो. स्निग्ध पदार्थांच्या ह्या गुणामुळेच “तैलबुद्धी” वगैरे शब्दप्रयोग प्रचारात आले. आहारात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ घेतले तर रक्तातील स्नेह (कोलेस्टेरॉल) वाढून हृदयाला धोका होण्याची शक्यताअसते. त्यासाठी उत्तम प्रतीचा स्निग्ध पदार्थ नाकातून गेला तर त्याचे रक्तात शोषण न होता तडक मेंदूपर्यंत पोचतो. म्हणून सर्वात श्रेष्ठ असलेला स्निग्ध पदार्थ “गायीचे तूप”निवडले. हे मेंदूपर्यंत पोचले तर मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहते. म्हणून ह्याचा प्रयोग नस्य स्वरूपात करावा. नाकाने घेतलेले औषध मेंदूपर्यंत क्षणार्धात पोचते. फीट आल्यावर कांद्याचा उग्र वास त्वरित उपयोगी पडतो हे आपण अनेकदा पहिले असेल. ह्याचाच अर्थ मेंदूच्या कार्यासाठी नाक हा सहज, सोपा आणि जवळचा मार्ग आहे.
ह्या विषयावर सखोल अभ्यास करून मी स्वतः “कुंकुम घृत” तयार केले.
केशर, वेखंड, तुळस इत्यादी वनस्पती सिद्ध करून देशी गायीचे तूप असे घटक कुंकुम घृतात आहेत. रोज सकाळी ४-४ थेंब नाकात टाकावेत. शालेय विद्यार्थ्यांपासून पुढे पन्नाशी नंतर प्रत्येकाने हे एक रूटीन म्हणून करावे म्हणजे मेंदूचे पोषण उत्तम राहून बौद्धिक क्षमतेत सुधारणा होते.
सुमारे १०-१२ वर्ष हे मी अनेकांना दिले. त्याने झालेले फायदे थोडक्या शब्दात –
· चौथीत चष्मा लागला होता. बारावीत हे नस्य चालू केले आणि सहा महिन्यात चष्मा गेला.
· कित्येक वर्ष मायग्रेनचा (अर्धशिशी) त्रास होता. आता क्वचित ६ महिन्यातून एखादवेळ डोके दुखते.
· रात्री झोप शांत लागते आणि दिवस अगदी उत्साहपूर्ण राहतो.
· अभ्यासात एकाग्रता वाढली आणि वाचलेले सर्वकाही स्मरणात राहू लागले.
· कॉम्प्यूटरचा वापर सतत, त्यामुळे डोळे दुखत असायचे. त्रास जवळजवळ गेलाच.
· सर्दीने सतत कानात दडे बसायचे. आता सर्दी होताच नाही आणि झाली तरी दडे बसत नाहीत.
· उन्हात गेल्यावर भयंकर डोकेदुखी होत असे. आता हा त्रास ९०% कमी झाला.
· लहानसहान कारणामुळे प्रचंड राग येत असे. आता राग येत नाही.
· माझे केस गळणे थांबले आणि बऱ्यापैकी वाढ होते असे लक्षात आले.
· सही करतांना किंवा हाताने कोणतेही काम करतांना हात थरथरायचे. महिन्याभरात त्रास बंद झाला.
· शून्य साईड इफेक्ट्स. किंबहुना नकळतपणे होणारे अनेक साईड बेनिफिट्स.
अधिक माहितीसाठी –
डॉ. संतोष जळूकर, मुंबई
+917208777773
+919969106404
Leave a Reply