नवीन लेखन...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन

टी एन शेषन यांचा जन्म १५ डिसेंबर १९३२ रोजी झाला.

‘इलेक्शन किंग’ अशी ओळख असलेले तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन उर्फ टी.एन. शेषन हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. टी.एन. शेषन हे १९५५ च्या स्पर्धा परिक्षेच्या चेन्नई केडरचे आयएसएस टॉपर होते. १९९० मध्ये जेव्हा त्यांनी पदभार स्विकारला तेव्हा निवडणूकीची स्थिती अतिशय वाईट होती. मात्र शेषन यांनी ही स्थिती सुधारत त्यामध्ये सुसूत्रता आणली. शेषन यांनी कठोर पाऊले उचलली आणि ही स्थिती बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. टी. एन. शेषन यांनी त्यांच्या काळात आचारसंहितेचा दणका देत खंबीर भूमिका घेतल्याने निवडणूक आयोगाचे अस्तित्व सामोरे आले. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. विशेषत: बिहारमध्ये मतदान केंद्रावर हिंसा आणि इतर काही घटना घडत होत्या. १९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा बिहारमध्ये नि:पक्षपाती निवडणूक पार पाडण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. यामुळे त्यांचे अनेक नेत्यांशी संबंधही खराब झाले. मात्र त्याची पर्वा न करता त्यांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली.

निवडणूकीसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्यांनी पुढाकार दाखवल्याने वेगळे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची विशेष ओळख होती. १९९६ साली निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेषन यांनी मनी आणि मसल पॉवरवर कडक निर्बंध लादण्याचे काम केले. जागोजागी रंगवल्या जाणाऱ्या भिंती, पोस्टर, हँडबिल, वर्तमानपत्रतील जाहिराती आणि बातम्यांचा खर्च उमेदवारांच्या खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतला.

डिसेंबर १९९३ मध्ये शेषन यांनी उमेदवाराची संपत्ती शपथपत्रद्वारे सादर करण्याचा आदेश काढला. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत होणारा खर्च उदा.पोस्टर, सार्वजनिक बैठका, जाहीर सभा, ध्वनिफिती, हँडबिल यावर होणाऱ्या खर्चाचे अकाउंटिंग करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या खर्चाचा तपशील नोंद ठेवण्याची अंमलबजावणी अधिकाऱ्याकडून होते की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्हिडीओ कॅमेरामन नेमल्यामुळे निवडणुकीची सर्व प्रक्रिया कॅमेराबंद होऊ लागली.

तीन-चार टप्प्यांत मतदान घेण्याची पद्धती टी.एन. शेषन यांनीच सुरू केली. मतदारांसाठी ओळखपत्र तयार करण्याची कल्पनाही टी.एन. शेषन यांचीच होती. ९० च्या दशकात त्यांचे निवडणूक आयोगामध्ये इतके वजन होते की ‘भारतीय राजकारणी फक्त दोन गोष्टींना घाबरतात. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे टी.एन शेषन’ असं त्यांच्या बाबतीत म्हंटल जायचं !

त्यांना १९९६ मध्ये शासकीय सेवेसाठीचा रमॉन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. १९९६ साली मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर टी. एन. शेषन चेन्नईत स्थायिक झाले. त्यानंतर लगेच ते १९९७ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीलाही उभे राहिले पण त्यांच्या कडक शिस्तीमुळे दुखावलेल्या राजकारण्यांनी त्यांना मोठ्या फरकाने पराभूत केलं. तरीही शेषन अधूनमधून देशातल्या राजकीय घडामोडीवर आवर्जून आपलं परखड मत मांडायचे. छोट्यामोठ्या कार्यक्रमांना हजेरीही लावायचे.

टी. एन. शेषन हे सत्यसाईबाबांचे कट्टर भक्त होते. पण सत्यसाईबाबांच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातं. पुढे २०११ साली सत्यसाईबाबांच्या निधनानंतर टी. एन. शेषन सार्वजनिक जीवनातून एकप्रकारे विजनवासातच गेले. टी.एन. शेषन हे सध्या चेन्नईमधील एका वृद्धाश्रमात ते एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे राहत होते. त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याचीही माहिती समोर येत होती.

टी एन शेषन यांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..