नवीन लेखन...

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर

दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी राजापुर येथे झाला.

दिलीप वेंगसरकर यांनी १९७५ साली इराणी ट्रॉफीमध्ये क्रिकेट मध्ये आगमन केले. सी. के. नायडूनंतर लांब लांब षटकार मारणारा हाच म्हणून त्यांची ‘कर्नल’ अशी ओळख झाली. मुंबईचा संघ त्यावेळी नागपूरमध्ये शेष भारताविरुद्ध इराणी करंडक सामना खेळत होता. त्या सामन्यात बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना सारखे गाजलेले गोलंदाज समोर होते. मुंबईची सुरुवात खराब झाल्यानंतर एका १९ वर्षीय युवकाने हिमतीने डाव सावरला. तेव्हा आकाशवाणीवर समालोचन करणारे माजी क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी, ‘ हा युवक कर्नल सी. के. नायडू यांच्यासारखा खेळतो,’ अशी दाद दिली होती.. पुढे तर, प्रसारमाध्यमांनी ‘कर्नल’ हा शब्द दिलीप वेंगसरकर यांच्या नावासोबत कायमचाच जोडला. तुम्ही लष्करात कधी होता, असे काही जण आताही वेंगसरकर यांना कुतुहलाने विचारतात. वेस्ट इंडिजच्या त्याच्या पहिल्या दौऱ्यात कर्दनकाळ पिचेससमोर त्याला त्रास झाला. पण पुढील काळात त्याने आपली वन डाऊन पोझिशन बनवली. वेंगसरकर, विश्वनाथची लॉर्ड्सवरची भागीदारी, गावसकर, वेंगसरकरची ओव्हलवरची भागीदारीतला लॉर्ड्सला वेंगसरकर, विश्वनाथने सेंच्युरी मारून मॅच ड्रॉ केली. १९७९ च्या इंग्लंड दौऱ्यात गावसकर आणि वेंगसरकरने ४३७ धावांचा पाठलाग सत्यात उतरवून दाखवला. गावसकरने २२१ करताना दुसऱ्या बाजूने चौहान आणि वेंगसरकरने खंबीर साथ दिली. खालच्या फळीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने आठ रन्स कमी पडल्या आणि मॅच ड्रॉ झाली. वेंगसरकरच्या लॉर्ड्सच्या तिन्ही सेंच्युरीज कमाल होत्या. दिलीप वेंगसरकर यांची एक स्मरणीय खेळी म्हणजे १९८५ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेटमध्ये सेमी फायनलला न्यूझीलंडविरुद्ध केलेले अर्धशतक. धावा करणे अवघड असतानासुद्धा त्यांनी डोळय़ांचे पारणे फिटणारे कव्हर ड्राइव्हज् मारले आणि कपिल देव यांच्या साथीत मॅच जिंकून दिली.

दिलीप वेंगसरकर यांच्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्सवर साकारलेले सलग तीन शतके. सहा फूट उंचीचा वेंगसरकर एकाग्रतेने स्टान्स घेऊन उभा राहिले की हिमालयातल्या शिळेवर डोळे मिटून तपश्चर्येला बसलेल्या ऋषीसारखाच वाटे. डिफेन्स करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. डिफेन्स करताना तो फार वाकत नसे. बॉलला बॅटवर लेट येऊ देऊन उभ्या उभ्या संरक्षण करण्याचे त्याचे तंत्र होते. काही वेळेस उभ्या उभ्या खेळण्याने त्याचा घात व्हायचा. पण फलंदाजीच्या बायबलमधले सगळे फटके तो बाळगून होता. मिडऑन आणि मिडविकेटमधून मारलेला रायफल शॉट त्याचा ट्रेडमार्क होता. त्या दर्जाचा शॉट नंतर द्रविडकडे पाहायला मिळाला. कव्हर्समधून ड्राइव्ह मारताना गौतम राजाध्यक्षांना घायाळ करेल असा त्याचा फॉलो थ्रू होता. भारतीय फलंदाजांना सहसा वश न होणारे हूक आणि पूल त्याच्या भात्यात होते. दिलीप हे एक सेफ क्षेत्ररक्षक होते. फॉरवर्ड शॉर्टलेगला त्यांनी काही उत्तम झेल घेतले आहेत. दिलीप वेंगसरकर निवृत्ती नंतर ॲ‍कॅडमी चालवल्या आहेत. गावोगावी जाऊन होतकरू खेळाडू हेरले. निवड समिती अध्यक्ष असतानासुद्धा दिलीप वेंगसरकर यांनी सचोटीने काम केले आहे.

भारताचे कर्णधारपद, गुणवत्ता जोपासना समिती, निवड समितीचे अध्यक्षपद असे कारकीर्दीतील अनेक महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता वेंगसरकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपद आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद सांभाळत आहेत. दिलीप वेंगसरकर यांना बीसीसीआयने सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवले आहे. आपल्या समुहातर्फे दिलीप वेंगसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..