महाराष्ट्राचे माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांचा जन्म ४ जुलैला झाला.
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी म्हणून गेली ३५ वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय होते. दूरदर्शनच्या गाजलेल्या महाचर्चा कार्यक्रमाचे ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी ‘करिअरनामा’ हे सदर त्यांनी सुरू केले . या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत असत. त्यांचे हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत असत. पुढे त्याचेच फलित म्हणजे २५० सरकारी अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांची माहिती असलेले “करिअरच्या नव्या दिशा” हे त्यांचे पुस्तक होय. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या मुली,महिलांवर त्यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी कथा ‘गगनभरारी’ या त्यांच्या पुस्तकात तर युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा ‘प्रेरणेचे प्रवासी’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. पुढे याच नावाने त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित झाले. मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. थायलंड,नेपाळ,रशिया, आर्मेनिया, अझरबयझान या देशांबरोबरच भारतात, महाराष्ट्रात त्यांची विविध ठिकाणी संवाद सत्रे झाली आहेत, होत असतात. विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात.”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे .
साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिक नाट्य,चित्रपट ,दूरदर्शन, प्रसार माध्यमे यात कार्यरत राहण्यासाठी देवेंद्र भुजबळ सतत प्रयत्नशील असतात. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते काम करत असतात.
थोर व्यक्तींच्या जीवनांवर आधारित अभिमानाची लेणी हे त्यांचं ई पुस्तक गेल्या वर्षी ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. शाहू महाराजांचे कार्य अस, तुकडोजी महाराज यांची कामगिरी असो, जांभेकरांची पत्रकारिता असो, रवींद्रनाथांची साहित्याची भरारी असो, महात्मा फुले यांची जनसेवा असो, विनोबा भावे यांची लोकोपयोगी कामे असो, अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार असो, उत्तम तुपे असो, वि. स. पागे यांचे काम असो प्रत्येकाच्या कार्याची देवेंद्र भुजबळ यांनी उत्तम मांडणी केली आहे.
देवेंद्र भुजबळ यांचा संपर्क क्रमांक:+91 9869484800.
इमेल: devendrabhujbal4760@gmail.com
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply