भारतकुमार राऊत यांचा जन्म ६ एप्रिल १९५३ रोजी मुंबई येथे झाला.
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
मुंबई दूरदर्शनवरही त्यांनी काम केलं होतं. तसंच ‘झी न्यूज’च्या स्थापनेपासून त्यांनी झी समूहात काम केलं होतं. १९८७-८८मधल्या काळात ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. ते शिवसेनेकडुन राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.
भारतकुमार राऊत यांचा मुलगा ओम राऊत हा चित्रपट फिल्म निर्देशक, लेखक,व निर्माता असून त्याचा नुकताच ‘तानाजी: द अनसंग वॉरियर्स’ प्रदर्शित झाला होता.
अंधारातील एक प्रकाश, शिवसेना : हार आणि प्रहार, स्मरण, अशी ही मुंबई, गीता: आनंद यात्रा -अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
त्यांना राम मनोहर त्रिपाठी पत्रकार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार, जायट्स इंटरनॅशनलचा जर्नालिस्ट ऑफ दी इयर पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव स्मृती पत्रकारिता पुरस्कार, स. गर्गे पत्रकारिता पुरस्कार, ‘असोसिएशन ऑफ बिझिनेस कम्युनिकेटर्स’चा बेस्ट बिझनेस जर्नालिस्ट पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
Leave a Reply