नवीन लेखन...

कोकणातील किल्ले प्रबळगड व कलावंती सुळका

(जिल्हारायगड,तालुकापनवेल,प्रकारगिरिदुर्ग,श्रेणीमध्यम,उंची७०८.६६ मी उंची २३२५ फुट)

पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध असे किल्ले प्रबळगड व कलावंती सुळका आपल्याला इथे कोणत्याही ऋतूत भेट देता येते. हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारे आहे कारण पावसाळ्यात व हिवाळ्यात इथे दाट धुके असल्यामुळे जणू या परिसरात स्वर्गच निर्माण होते. सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणत या किल्याला भेट देतात प्रबळगडावरून दिसणरे कलावंती सुळक्याचे भयाण रूप पाहता त्याचे खडकात कोरलेले पायऱ्या काळजात धड्काच भरून टाकतात. कठीण श्रेणीतील वाटणारा हा सुळका शांत चित्तपने चढाई केल्यावर सहज सर करता येतो. माचीवर वसलेल्या ठाकूरवाडीत जेवणाची राहण्याची व्यवस्था असल्याने बरेच गिर्यारोहक हे एक दिवस मुक्काम करून किल्ला व सुळका दर्शन घेतात.

भौगोलिक दृष्ट्या अतिशय मौक्याची ठिकाणी असलेला हा किल्ला आहे. पेण व चौल व्यापार केंद्रावर प्रमुख लक्ष ठेवण्यासाठी बांधला आहे. किल्यावरुन पेब/विकटगड, चंदेरी किल्ला, मलंगगड, नागफनी, कर्नाळा हे किल्ले दिसतात.

प्रबळगडाची प्राचीनता पाहता याच्या इतिहासात डोकावणे गरजेजे ठरते. किल्यावरील खोदीव गुहा व खडकातील पाण्याचे टाके यावरून हा किल्ला आपल्या प्राचीनतेची साक्ष देत उभा आहे.

इतिहास:- अनेक राजवटी पाहिलेला हा गड पुढे बहमनी साम्राजात आलेला असावा व त्यानंतर बहमनी साम्राज्याचे तुकडे झाल्यावर इ.स.१४९० मध्ये हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजे जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने हा किल्ला पावन झाला होता. बाल शिवराय याच किल्यावर रांगायला शिकले असे काही इतिहासकार यांचे मत आहे. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजे यांच्या तहा नुसार हा किल्ला आदिलशाहीत आला. इ.स. १६५७ ऑक्टोबर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही ताब्यातील हा किल्ला जिंकला. या लढाईमध्ये या किल्याचा किल्लेदार केसरीसिंह हा लढाई दरम्यान मारला गेला. किल्ला जिंकल्यानंतर महाराज किल्यावर आले. किल्यावर केसरीसिंह याच्या आईचे सांत्वन करून सन्मानाने तिला देऊळगावी पाठविले. बखरीत आलेल्या उल्लेखा नुसार हा किल्ला घेतल्यावर महाराजांना किल्यावर बरेच द्रव मिळाले होते. किल्ला ताब्यात आल्यावर या सर्व भागाची सुभेदारी आबाजी महादेवाकडे महराजांनी दिली होती. या भागातील वसुलीच्या जमाबंडीचे हिशोब तपासण्यासाठी येथील देशमुख,देश कुलकर्णी सेट्ये,महाजन व अन्य अधिकारी यांना प्रबळगडावर बोलावले होते. तेव्हा कामचुकार करणाऱ्या आपाजी तावजी या चेउल च्या देशकुलकर्णी याची महाराजांनी चांगलीच कानउघाडनी केली होती.

१३ जून १६६५ च्या मिर्जा राजा जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदरच्या तहानुसार जे तेवीस किल्ले मुघलांना देण्यात आले त्यात प्रबळगडचा हि समावेश आहे. इ.स.१६९९ मध्ये खांदेरी किल्ला,सागरगड व राजकोट किल्याचे आमलदार माणकोजी मराठे, उदाजी पडवळ व सुभानजी खराडे हे मुघलांच्या आक्रमणाने आपली ठाणी सोडून प्रबळगडावर आश्रयाला गेले.इ.स.१८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी ब्रिटीशांनी किल्याची बरीच हानी केली होती.

१७ जुलै १६८९ रोजी मध्यरात्री मुघल सरदार मातबरखान याने छापा घालून मराठ्यांपासून हा किल्ला हस्तगत केला.त्यानंतर मराठ्यांनी लगेच हा किल्ला मुघलांकडून हस्तगत केला. इ.स.१६९९ मध्ये खंदेरी,सागरगड, व राजकोटचे   आमलदार माणकोजी मराठे, उदाजी पडवळ व सुभानजी खराडे हे मुघलांच्या आक्रमणाने आपली हि ठाणी सोडून प्रबळगडावर आश्रयाला आले. इ.स.२५ डिसेंबर १८२८ मध्ये ब्रिटीशांविरुद्ध रामोशी (कोळ्यांनी) उठाव केला पुणे जिल्यातील पुरंदरच्या आसपास त्यांचा सुळसुळाट झाला. त्याचे नेतृत्व राजश्री उमाजी नाईक व भूजाजी नाईक यांनी केले. त्यांच्यापैकी ३०० लोक कोकणात उतरले व त्यांनी प्रबळगडाचा आश्रय घेतला.

कालांतराने इ.स.१८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला इंग्रजांनी किल्याची बरीच नासधूस केली.

प्रबळ गडावरील दुर्ग अवशेष

१.तटबंदी- किल्यावर काहीसा भाग हा चारही बाजूने तटबंदीने व्यापलेला आहे.

२.गुहा- किल्याच्या पायथ्याला दोन गुहा आहेत त्यातील एक गुहा कलावंती सुळक्या जवळ आहे. त्या गुहेच्या आतमध्ये १६ फुट लांब असून ३ बाय ३ फुट एवढी रुंद आहे एक ६ फुट लांब व ४ फुट रुंद उंची ३.५ फुट एवढी खोली आहे. त्या गुहेच्या बाहेर मारुतीचे चित्र कोरले आहे. दुसरी गुहा बैलशिंगाच्या वाटेच्या डाव्या बाजूला आहे.

३. बुरुज-किल्यावर चार बुरुज आहेत त्यापैकी काळा बुरुज व कलावंती सुळक्याच्या आतील बाजूस असलेला बुरुज सुस्थितीत आहे.

४.दरवाजा- बैलशिंगाच्या वाटेवरील दरवाजा नामशेष झाला असून त्याचा उंबरठा फक्त दृष्टीस पडतो.तर काळ्या बुरूजा कडून किल्यावर येण्यास चिंचोळी वाट आहे.

५.पाण्याचे टाके- किल्यावर एकूण चार पाण्याचे टाके आहेत. ६.नैसर्गिक जलस्त्रोत्र- एकूण तीन नैसर्गिक जलस्त्रोत्र आहेत.

७.तलाव- किल्यावर एकूण तीन तलाव आहेत त्यात एक बांधीव तलाव हि होत. त्यातील एक तलाव अस्तित्वाव आहेत व इतर दोन तलाव मातीने बुजलेली आहेत.

८.वाड्याचे अवशेष- किल्यावर जागो जागी वाड्याचे अवशेष दिसतात.

९.मंदिर- किल्यावर वाघोबा मंदिर,गणेश मंदिर व शिव मंदिर आहेत.

१०.चुन्याचा घाणा- काळ्या बुरुजाजवळ चुन्याचा घाणा आहे.

११.माची-किल्याची माचीचा विस्तार मोठा असून त्यावर मंदिरे व लोकवस्ती आहे माचीवर शेती केली जाते.

कलावंती सुळका

प्रबळगडावरील सुळक्यास कलावंतीचा सुळका असे म्हणतात. स्थानिकलोक कलावंतीचा महाल असे म्हणतात. या सुळक्यावरील खोदलेल्या गुहांचा अभ्यास केल्यास याचा कालखंड प्राचीन काळाशी संबंधित असण्याची शक्यता आहे.  या सुळक्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या असून वर पाण्याची टाकी हि आहे. हा सुळका प्रबळगडावरील चौकी पहारे साठी वापरण्यात येत होता. पूर्वी दरवर्षी स्थानिक ठाकर लोक होळी सणाला कलावंती सुळक्यावर ठाकर नुत्य करत असत. प्रबळगडावरून दिसणारा कलावंती सुळका हा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

किल्यापर्यंत पोचणाऱ्या वाटा:-

१.पनवेल मधील शेडुंगमार्गे :- मुंबई व पुणे वरून वरून पनवेल गाठावे पनवेल पासून ८ किमी अंतरावर शेडुंगफाट्यावर उतरावे किंवा शेडून फाट्या मधून आत ५ किमी अंतरावर ठाकूरवाडी गावात यावे. ठाकूरवाडी मधून प्रबळगडावर जाणारी वाट आहे. या वाटेने १ तासात प्रबळ माचीगाव येथे पोहचतो. येथून कलावंती सुळक्यावर जाण्यसाठी ४० मिनिटे लागतात. तर प्रबळगडावर जण्यासाठी १ तास लागतो. तर किलच्या पायथ्यापासून ३ ते ४ तास प्रबळगड गडमाथा गाठायला लागतो.

२.पोइंज गावातून :- पनवेल पासून चौक येथे आल्यावर पोईंज फाटा लागतो तेथून पोईंज गावी जावे तेथून प्रबळमाची डोंगर सोंडेवरून प्रबळ गडावर पोहचण्यास २ तास लागत्तात. माचीगावात राहण्याची जेवणाची व्यवस्था आहे.

लेखक :

गणेश दत्ताराम रघुवीर,मुंबई

गडकिल्ले अभ्यासक

 

 

 

 

Avatar
About Raghuveer Ganesh Dattaram 1 Article
मी राहणार मुंबई मध्ये असून एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. मला गडकिल्ले भ्रमंती आवड असून मी गडकिल्ले संवर्धनसाठी हि काम करतो. महाराष्ट्रातील किल्यांची सद्य स्थिती व इतिहास नवीन तरुणांना पर्यंत पोहचावी या दृष्टीकोनातून मी किल्यांवर संशोधन करत आहे. माझे दोन किल्यांवरील संशोधन लेख २०१६ आणि २०१७ इतिहास संशोधन मंडळ मुंबई त्रेमासिकेत प्रसिद्ध झाले आहेत. तसेच दिवाळी अंक २०६ २०१७ मध्ये लेख प्रकाशित झाले असून अनेक किल्यांवरील लेख हे वृत्तपत्रात हि प्रसिद्ध झाले आहेत. मला मराठी सुष्ट्री वाचकांसाठी किल्ल्यांवरील लेख लिहायला आवडेल. धन्यवाद गणेश रघुवीर ,मुंबई

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..