नाशिक म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला तसंच राकट व अवघड वळणाच्या गड-किल्ल्यांनी आणि डोंगरमाळांनी नटलेला जिल्हा. यापैकी काही किल्ल्यांना जितके ऐतिहासिक महत्त्व आहे तितकेच अध्यात्मिक देखील. मार्कंडे्य हा किल्ला देखील इतिहास व अध्यात्माची साक्ष देणारा किल्ला असल्यामुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र आहे.वणी – दिंडोरीच्या लढाई नंतर नाशिक परिसरातील अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकूले होते. त्यामध्ये मार्कंड्य किल्ल्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले. नाशिक – सापूतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावराअसलेल्या वणी गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणी पासून ९ किमी वर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किलोमीटर वरील मुळाणे खिंडीत येतो. येथे पोहोचण्यासाठी एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या – जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.
मार्कंडे्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला शंकराच्या सुबक मूर्तीचे दर्शन घडते. शेजारीच असलेल्या पायर्या गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. १३३६ फुट उंची आसलेला या किल्ल्याला दगडातून कोरलेल्या पायार्यांमधून तर कधी कातळ खडगावरुन वाट काढावी लागते. घसरण्याची भीती नसली तरीपण चालताना सावधानता बाळगावी विशेषत: पावसाळ्यात ! या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना “ध्यान गुंफा” असे देखील म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. हा पायर्यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला “कमंडलू तीर्थ” म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बाराही माहिने असते. दुसर्या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. अवघ्या तासाभरातच किंवा पाऊणतासातच चढाई पूर्ण झाल्यावर एका मातीच्या सरळश्या वाटेवर आपण येऊन पोहोचतो. आणि येथेच आपल्याला मार्कंडे्य ऋषींचा आश्राम दिसतोन. या आश्रमात मंदीर देखील आहे जिथे आपल्याला शंकर तसंच दत्ताची मूर्तींचे दर्शन घडून येते. या आश्रमात रहाण्याची व खाण्या सोय देखील होऊ शकते कारण मंदिरातील पुजारी व सेवेकरी यांचा आश्रमामध्ये मुक्काम आहे . मार्केंडे्वर मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी आश्रमाच्या डावीकडून जावे लागते. येथे आपल्याला मार्केंडेय ऋषींची समाधी सोबततच शिवलिंगाचे देखील दर्शन घडते. या मंदिरामध्ये सणा-सुदीच्या दिवशी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते.
या गडाच्या पश्चिमेला सप्तश्रृंगी मंदीर तर पूर्वेकडे रवळ्या-जवळ्या, धोडप, बालगण तालुक्यातील जैन धर्मीयांची तीर्थस्थान असलेल्या मांगी-तुंगी किल्ले आणि साल्हेर-सालोटा सारखी शिखरे पहावयास मिळतात. मार्कंड्यच्या सर्वोच्च शिखराच्या डावीकडच्या मार्गाने आपल्याला सप्तश्रृंगी मंदिराच्या दिशेने पण जाता येऊ शकते. तटबंदी नसल्यामुळे चालताना फक्त काही प्रमाणात खबारदारी बाळगावी . गडावरुन विहंगम दृश्याचे दर्शन होत असल्यामुळे फोटोग्राफर्सना “उत्तम क्लिक्स” मिळू शकतात. जर तुम्हाला दोन दिवसांची सुट्टी असेल तर मार्कंडे्य, रवळ्या-जवळ्या आणि सप्तश्रृंगी मंदीराला एकत्रितपणे भेट देता येऊ शकते. त्यामुळे ट्रेकिंग सोबतच अध्यात्माचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
— सागर मालाडकर
Leave a Reply