‘मालगाडी वाहतूक’ हे रेल्वेचं सर्वांत जास्त उत्पन्न असलेलं खातं आहे. सामानाच्या गरजेनुसार मालगाडीचे डबे तयार करणं हे महाजिकरीचं काम असतं. डबे बनवल्यानंतर प्रत्येक विभागाचे डबे एकाच मालगाडीला जोडले जातात व काही महिन्यानंतर त्यांची तांत्रिक क्षमता उत्तम साधण्यासाठी ते डबे पुन्हा आपापल्या विभागाकडे पाठविले जातात. मालगाडीचे डबे खालील गोष्टी वाहून नेत असतात:
- धान्याची पोती
- मिठागरातील मीठ
- लाकूड, लोखंड, त-हेत-हेच्या वायर्स
- गायी, म्हशी, घोडे, तसेच सर्कशीतील प्राणी (या डब्यांत मलमूत्र वाहून जाण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली असते. गुरांना चारा, दाणापाणी यांचाही पुरवठा करण्याची व्यवस्था असते.)
- वाळू, कोळसा, खनिज पदार्थ, पेट्रोल, विविध रसायनं, रेफ्रिजरेटर, दुधाचा पुरवठा करणारे टँकर्स, मोठमोठी मशिनरी घेऊन जाणारे कंटेनर्स.
- मोटारी, दुचाकी, ट्रक, तोफा, टॅक्स्, वगैरे युद्धसामान.
- कोरडा दुष्काळ पडला, तर अशा गावांना पाणी पुरविणारी टॅकर्सची संपूर्ण मालगाडी पाठविण्यात येते.
- सन १९४० ते १९४५ मध्ये मुंबई शहराचा कचरा शहराबाहेर नेण्यास मालगाड्यांची सोय होती.
आज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीत मालगाडीच्या डब्यांमधून होणाऱ्या वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील कारखान्यांतून व कार्यशाळांतून अशा डबे बांधणीचा वेग सातत्याने वाढतो आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply