नवीन लेखन...

वारंवार निखळणारा खांदा

खांदा हा असा सांधा आहे, की त्यात जास्तीत जास्त प्रकारच्या आणि सर्वात जास्त लांबपर्यंत फिरणाऱ्या हालचाली होतात. जो सांधा अशा रीतीने गोलाकार, पुढे-मागे फिरतो, आत वळतो, मागे वळतो असा दुसरा कोणताच सांधा आपल्या |शरीरात नाही. या सर्वविध हालचाल करणारा हा सांधा निसर्गतःच थोडा अस्थिर बनलेला आहे. त्यामुळे खांदा सटकणे हे इतर सांध्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळते. हा सांधा उखळीचा सांधा आहे; पण हे उखळ फारच पसरट असल्याने तो उखळीतून बाहेर सटकू शकतो. एकदा का तो सटकला, की त्यामुळे आजूबाजूच्या जाड आवरणाला फाडून ह्युमेरस या हाडाचे डोके सांध्याबाहेर पडते व त्याचबरोबर सांध्याच्या आत असलेल्या कास्थिची हाडाबरोबर असलेली बांधीलकीही फाटून निघते. अर्थात या सर्व गोष्टी माणूस वेडावाकडा पडून खांद्यावर अव्वाच्या सव्वा जोर आल्यावरच होतात. फिट येणाऱ्या माणसांना फिट आल्यावर किंवा जन्मतःच खांद्याचे आवरण कमकुवत असलेल्या लोकांनाही वारंवार खांदा सटकणे होऊ शकते. एकदा खांदा सटकला, की डॉक्टर तो पुन्हा बसवितात. यासाठी बहुतेक वेळा बेशुद्ध करून सांधा आत बसवावा लागतो. यानंतर आतील सर्व भागांचे व्यवस्थित जखम भरून येण्यासाठी चार-सहा आठवडे खांदा हालचाल न करता बांधून ठेवावा लागतो. एवढे करूनही ३० टक्के लोकांना पुनः पुन्हा खांदा सटकण्याचा रोग जडतो. अशांच्या बाबतीत कास्थिची हाडाशी असलेली बांधीलकी कायमची फाटणे (बँकर्स लिजन) पुन्हा व्यवस्थित न जुडणे. आजूबाजूचे आवरण कायमचे शिथिल होणे ही कारणे असतात. तरुण वयात हा प्रकार झाल्यास तरुणांना आपली रोजची कामे करणे कठीण होते. खेळाडू आपला खेळ खेळू शकत नाहीत. कारण खांदा वेळी-अवेळी सटकतो व माणूस थोडा वेळ अपंग होतो. अशांसाठी डॉक्टर शस्त्रक्रिया करून हे खांदे पूर्ववत करतात.

ही शस्त्रक्रिया फारच चांगली आहे. व्यवस्थित अनुभवी डॉक्टरकडून करून घेतल्यास खांदा सटकण्याची प्रक्रिया कायमची थांबते. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केल्याने माणूस एक दिवसातच घरी जाऊ शकतो. अर्थात थोड्या प्रमाणात खांदा उघडून ही शस्त्रक्रिया करता येतेच. पूर्वीपासून अशा प्रकारेच ही शस्त्रक्रिया केली जात होती. यानंतर एक महिना हात बांधून ठेवतात. त्यानंतर पूर्ण हालचाल येण्यासाठी योग्य व्यायाम फिजिओथेरापिस्टकडे करावे लागतात.

डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परीषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..