निराशेचे बीज पेरतो,आम्हीच आमच्या गुणानें,
विचारांना ताण देवूनी,जगा पाही त्याच दिशेने ।।१।।
जाणूनी ईश्वरी स्वरूप,प्रतिमा ती मनीं बसवी,
धडपड चालते सतत,तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।
तपसाधना ती बघूनी,कित्येकदा मिळे दर्शन,
परि केवळ अज्ञानाने,न होई त्याचे अवलोकन ।।३।।
सभोवतालच्या वस्तूंमध्यें,जाण तयाची येते,
निसर्ग रम्य सौंदर्यात,भावना तशी उमटते ।।४।।
अस्तित्वाची जाणीव देतो,हर एक घडीचा ठेवा,
ध्यास लागतो आम्ही,परी कल्पिलेल्या रूपी दिसावा ।।५।।
निराशा राहते सदैव,दर्शन न मिळता त्याचे,
पाण्यात राहून देखील,तहानलेला असे याचे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply