कबीराने एका रचनेमध्ये गाढवांना बांधण्याच्या पद्धतीची माहिती दिली आहे, ती मनोज्ञ आहे..
…गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.
…शहाणा कुंभार गाढवांना जोडीजोडीने बांधतो… म्हणजे त्यांना खुंटीला बांधत नाही, एकमेकांशी बांधतो. गाढवं जागची हलत नाहीत. हलूच शकत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात….याच्यावरूनच लग्नाची कल्पना सुचली असावी..
व्बाट्सअॅपवर आलेला हा एक विनोद. मला मात्र यात विनोदाबरोबरच आपल्या समाजातील एक सद्यपरिस्थ्तितीही दिसली. ती मी माझ्या शब्दांत व्यक्त केली ती अशी-
या गाढवांची आणखीही एक गंम्मत मला ऐकून माहित आहे. प्रत्यक्षातल्या गाढवांना बांधायचीही गरज नसते. फक्त बांधल्याची अॅक्टींग करायची, मग ते त्यांना बांधलंय असं समजून जागचे हलत देखील नाहीत. हे ही प्रत्यक्षातल्या आणि वरील विनोदात उल्लेखलेल्या ‘गाढवां’मधलं साम्यच नाही का?
तरी हल्ली विनोदातली ‘गाढवं’ स्मार्ट होत चाललीत हे टिव्ही सिरियल्स पाहून कळतंय..फक्त मंत्र म्हणून सात पावलं चललोय, आपल्याला काही बांधलेलं नाही हे त्यांना कळायला लागलंय आणि बांधलेली राहून देखील उकीरडा फुंकतायत. आणि त्यांना बांधणाऱ्या बिचाऱ्या ‘कुंभारा’ना वाटतंय की आपण ‘गाढवां’ना बांधून ठेवलंय म्हणून..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply