मायफळ/मायाफल
English Name:Gall Nut
ह्याचे २-५ मीटर उंचीचा गुल्म अथवा छोटा वृक्ष असतो.ह्याची पाने तीक्ष्ण,दंतूर,खरखरीत व ४-६ सेंमी लांब असतात.ह्याचे फळ लहान व लंबगोल असते.नवीन फांद्यात Adleria Gali Tinctoria नावाचा किडा शिरून अंडी घालतो व त्याच्या चारही बाजूस स्वरस जमा होऊन गाठ बनते.किड्यासह बनलेल्या ह्याच गाठीला मायफळ म्हणतात.हे २-३ सेंमी व्यासाचे व धुरकट पिंगट रंगाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.
चला आता आपण ह्याचे उपयोग जाणून घेऊयात:
१)केसांना रंगविण्यास मायफळ उपयुक्त आहे.
२)घसा व दातांच्या आजारात गंडूष व दंतमंजनार्थ ह्याचा उपयोग होतो.
३)जखमेतून होणारा स्त्राव मायफळ लावल्याने कमी होतो.
४)मायफळ कफनाशक असल्याने खोकल्यात उपयुक्त आहे.
५)घाम अधिक येत असल्यास मायफळ चुर्ण अंगाला चोळतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar