नवीन लेखन...

गळफास बोलला फांदीला

गळफास बोलला फांदीला

का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला

आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं

भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं

मग अाज कसा आला ह्यो ताफा

भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा

मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला

कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला

गळफास बोलला फांदीला…………

…………………………………………………

 

वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं

ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं

कुणीच काही बोलत नाही….

कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला

मलाही आता याचा भार तोलत नाही

कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय

पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय

…………………………………………………….

 

सुकलेली, पानं झडलेली फांदी

मग गळा दाटुन लागली म्हणायला

मला काही हे नवं नाही बाबा,

माझ्या खालचा जवा करपुन जातो माल

तवा असच होतं सारं, जे झालं काल

कोण देईल उत्तरे लाखो हुंदक्यांची

पुसलेल्या कुंकवांची कोण घेईल जबाबदारी

किड्यामुंग्यांसारखी माणसं मरायला लागली

यापरिस बरी असते महामारी …………

………………………………………………….

 

तु काय विचारतोस ह्या फांदीला

चल दोघं मिळुन आता विचारु

एकदाचं नोटेवरल्या गांधीला

सांदीला पडलेला दोर

कुठवर असा लटकत राहणार

बापु तुमच्याच देशात तुमचीच लेकरं

कुठवर मरत राहणार………..

………………………………………………..

 

डोळ्यावरचे हात काढुन , बापु माकडांनाही हे बघु द्या

कानांनी किंकाळ्या ऎकुन , तोडांनी काही बोलु द्या

तुमची खादी घालणारे , बापु इथं साधी भाषा बोलतच नाही

अन् त्यांचे जड जड शब्द , आम्हाला काही तोलतच नाही

नाहीतर बापु या देशात माती राहिल पण शेती नाही

अन् राहिलीच शेती तरी शेतकरी नाही….

………………………………………………….

 

कवि:- शशिकांत मा. बाबर

संपर्क :- ९१३०६२०८३४
shashikantbabar12@gmail.com


Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..