गळ्यातल्या एका मंगळसूत्राने
तिची वाट सोयीस्कर वाटते
डोळ्यांतल्या अश्रुंचे मोजमाप
काळ्या मण्यात सुख झाकून ती
सोन्याच्या वाट्यात दुःख लपवते
झोपडपट्टीतील बाई नवरा मारतो
हे टॉवरमधील बाईला सांगते
टॉवरमधील उच्चशिक्षित स्त्री त्यावेळेस
नवऱ्याचा मार मेकअपच्या आधारे लपवते
अशिक्षित किंवा उच्चशिक्षित
दोघींची दुःख सारखी असतात
नवऱ्याने दिलेल्या जखमा की वेदना
एक बोलून एक न बोलून सहन करतात
काळ बदलला बदल झाला
वारे नवीन वाहत राहिले
काही बायकांचे आयुष्य मात्र
काळ्या मण्यात व्यापून निःशब्द राहिले
तो छान मस्त वागला बाहेर तरी
घरी वेगळा नक्कीच वागतो
दुसऱ्यांसाठी असतो साधा पुरुष तो
पण तिच्यावर हक्क गाजवणारा नवरा असतो
झोपडपट्टीत, ब्लॉक, बंगला सगळीकडे
हे सार सहज घडत असते
तिच्या दुःखाचे नावं फक्त त्यावेळी
हक्काची त्याची बायको असे असते
तिच्या दुःखाशी त्याला जाणीव नसते
हक्क गाजववणारा पुरुषार्थ त्याचा उरतो
कितीक स्त्रिया आहेत अशा समदुःखी
नशीब नावाचे लेबल आयुष्य कपाळी सांधतो
गिधाड आणि लांडगे पावलोपावली भेटतात
घरचाच नवरा बरा यात बिचाऱ्या मूक होतात
मंगळसूत्र हे एक जन्मीचे न धागे तुटतात
कोण न समजणार तिला खरीखुरी मग
नाच ग गुमा हा खेळ संसारी रडवतात
मंगळसूत्रात बांधली जाते ती
हक्क त्याचा तिच्यावर कायम राहणार
कितीक दुःख ती सहन करते संसारी
अनेक सावित्री या अव्यक्त अशा घुसमटणार
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply