ॐ गँ , ॐ गँ , गँ गणपती गँ गणपती
महामंत्र हेरंबाचा प्रत्यक्ष-पराशक्ती ।।
गकार करि साकार, मोरया , मोहक गजशुंडा
गकार, गोंडस दंत वाकडा तुझा वक्रतुंडा
गकार, समईमध्ये नाचे ज्योती तमहारी
गकार, गर्भसमाधि गहन निजमातेच्या उदरीं
गकार गणदल, कार गुणबल, गकार गहन गती ।।
अकार अविचल आद्यस्वर अवतार तुझा मूर्त
अकार, बृहद्-अवकाशपोकळी कोटिसूर्यव्याप्त
अकार कालातीत अनंतहि, अकार तूंच अनादि
चिरशाश्वत तूं, अस्तित्वातच ब्रह्मांडाआधी
अकार , अवगुंठन सगुणाचें अद्वैताभंवती ।।
शिर टेकुन अर्धेंदु बने तन , नमन भालचंद्रा
याचक-ओंजळ अर्धेंदू , अर्धेंदु वरदमुद्रा
एकवटत बिंदूमधिं ऊर्जास्रोत अमर्याद
पंचप्राणांमधें घुमे घन अनुस्वारनाद
उरीं अनाहत ओंकाराची ओजस अनुभूती ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply