गणपती…
माझ्या चित्रातूनी प्रकटतो
माझा गणपती …माझा गणपती…
जणू स्वार असतो तो
माझ्या लेखणीवरी… माझा गणपती…
माझ्या मनात तो, माझ्या तनात तो
माझ्या हृदयात तो, माझ्या डोळ्यात तो
माझ्या डोक्यात तो, माझ्या विचारात तो
माझ्या प्रेमात तो, माझ्या समर्पणात तो
माझ्या भक्तीत तो, माझ्या शक्तीत तो
माझ्या माझ्यात तो, आहे सर्वत्र तो
माझा गणपती…माझा गणपती
माझ्या कवितेतील प्रत्येक शब्दात
शब्दावर असतो तो गणपती…
त्याच्या सोबत असते सरस्वती
लक्ष्मी त्याची माऊली
म्हणून तिची कृपा आमच्यावरी
आम्ही मानतो त्याला आमचा शाळकरी
आणि तो असतो आमचा सखा सोबती
आमचा गणपती …आमचा गणपती…
देव्हाऱ्यात तो , देवळात तो,
ग्रंथात तो, वेदात तो, चराचरात तो ,
निर्गुण निराकार तो
तरी झाला आमच्यासाठी सगुण तो
आमचा गणपती … आमचा गणपती…
नतमस्तक मी जन्मोजन्मी त्याच्या चरणावरी
झोपेतही मी गातो आणि स्मरतोही
गणपती…गणपती…गणपती…
© कवी – निलेश बामणे
Leave a Reply