‘गणेश’ हे नांव तयार करणारी मराठी वर्णमालेतील ‘ग’, ‘ण’ आणि ‘श’ ही तीन अक्षरं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या तिनही अक्षरांमध्ये त्यांचा काना स्वतंत्र, म्हणजे मुख्य अक्षरापासून किंचित अंतर राखून अदबीने उभा आहे.
ह्या तिनच अक्षरांचं हे वैशिष्ट्य. ह्या तीन अक्षरांव्यतिरिक्त बाकीची अक्षरं कान्याचा आधार घेऊन किंवा कान्यात गुरफटून किंवा ‘ळ’सारखी काना(कणा)हीन होऊन उभी आहेत..
गणेश नांव धारण करणारा गणपती बुद्धीची देवता आहे व बुद्धी स्वतंत्र असते, असावी असंच तर ही अक्षरं सुचवित नसावीत ना?
अशा या गणेशाच्या उत्सवाच्या ‘तुम्हाला शुभेच्छा’ असं तरी कसं म्हणू? जो संपूर्ण केवळ शुभ आणि शुभच आहे, तो शुभच करणार..!
श्रीगणेशाचे आशीर्वाद नेहेमीच आपल्यासोबत असोत, ही माझी सदिच्छा..!!
-नितीन साळुंखे
Leave a Reply