दीड दिवस , पाच दिवस,
कुणाकडे रहातोस अकरा दिवस.
सारे आळवणी करतात तुझी,
कुणी करतात तुला नवस.
काय सांगावा रुबाब तुझा,
पेढे मोदक नुसती मज्जा.
ऐषआराम सुखात ठेवतात तुला,
आरत्या भजनांचा एकच कल्ला.
घरही सारे न्हाऊन निघते,
तुझ्या असण्याने भारून जाते.
सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतात तुला,
अष्टसात्विक भाव जागवतात मनाला.
सगळं छान शुभ प्रसन्न असतं,
अशुभाला इथे स्थानच नसतं.
भक्तांच्या प्रेमाने तू ही गहीवरतोस,
जड अंतःकरणाने परतायला निघतोस.
इथपर्यंत बाप्पा सगळंच असतं छान ,
जयजकार करत असतात मोठे लहान.
विसर्जनाचं भयाण, सत्य येतं समोर,
देवत्व संपतं,उभ राहातं वास्तव कठोर.
विटंबना बाप्पा पहावत नाही डोळ्यांना,
दिव्यत्वाचा तुझ्या, विसर पडतो साऱ्यांना.
विसर्जन कसलं देवा, ढकलून देतात तुला,
भग्नावशेष पार्थिवाचे –
विखरून पडतातकिनाऱ्याला
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply