लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या. तिथे त्या घरातील एक आज्जी सकाळी सकाळी उठून आवरुन तिथे बसायच्या आणि अगदी शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना. भांडी घुणी करणाऱ्या. भाजी वाले. दूध वाले ते पार ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे बोलत बसायच्या ते मी शाळेतून येई पर्यंत. आणि मग साडे बारा ते एकच्या दरम्यान आत जाऊन जेवण झाल्यावर थोडा आराम केला की पाच वाजता चहा घेऊन परत ज्या बसायच्या ते रात्री आठ वाजता परत घरात..
पण पाचला आजुबाजुच्या एकेक बायका येऊन गप्पा मारायला सुरुवात आणि परत एकेक जण जायच्या. आता गप्पा मारायला येणाऱ्या बायका अनेक वयोगटातील. आणि विषय असा ठराविक नाही. स्वतःचे अनुभव सल्ला. काही औषध. घरातील नाती कशी टिकवायची. सणानिमित्त माहिती. पद्धत. असे एक ना अनेक गोष्टी सांगायच्या. त्यामुळे घरातील वातावरण सुधारले होते अनेकदा काहीच्या घरात. जुनी गाणी. कथा यांचा तर खजिनाच होता. अंत्यत काटकसर करून संसार सुखाचा केला होता. आणि विशेष म्हणजे हे की घरातील नातवंड. मुलगा. सून नवरा यांच्या कडे कुणीही आले तरी अगोदर आज्जीशी बोलणार नतंर जातानाही पायरी वर बसून बोलून मगच जाणार. आणि कधी कधी त्या मुंबईतील मुलाकडे गेल्या की सगळी गल्ली सामसूम व निरस वाटायची. इतका लळा लागला होता सर्वांना..
दैव जाणिले कुणी असेच झाले. मुलाची बदली झाली. नवऱ्याला देवाज्ञा झाली. नातवंड शिकायला व लग्नाच्या निमित्ताने बाहेर पडले. आणि आता वय झाले. गुडघ्याच्या आजार. ऐकू येत नाही म्हणून घर सोडून त्यांच्या सोबत जावे लागले. सूनबाई अबोल आणि मुलगा कामात. आणि घराला पायऱ्या नाहीत. अनोळखी गाव. जो तो आपापल्या कामात. कुणी येण नाही की जाण नाही. टिव्ही वर जास्त बघत नाहीत. वेळ जात नाही. कुणाशी तरी बोलाव असे वाटते पण त्यांना कोणीही समजून घेऊ शकत नाहीत. दिवसातील खूप वेळ बाहेरचे बघत बोलत बसणाऱ्या आज्जी आता एकाकी जीवन जगत आहेत. वाईट वाटलं. आणि आठवण होते. त्या पायर्यांची.
पैसा न आडका खर्च न करता आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा ठेवा असतो हे गप्पांच ठिकाण. त्यामुळे कितीतरी महत्वाचे ज्ञान मिळाले. आणि माझ्या आत्ताच्या इथे आल्यावर अनुभवाने शिकवले आहे की काहीही नसले तरी चालेल पण गप्पा मारायला एक ठिकाण नक्की असावं.
तुम्हाला आहे का असे ठिकाण?नसेल तर शोधा आणि इगो, प्रेस्टिज वगैरे सर्व सोडून मनापासून मनमोकळ्या गप्पा मारल्या ना की बघा अनेक आजार होणार नाहीत आणि बरेच प्रश्न सुटतील. हो पण एक पथ्य जरुर पाळायचे असते ते म्हणजे याची वाच्यता करता कामा नये. पुढे एक मागे एक असे नको च आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणालाही दुखवायचं नाही. माघारी निंदा नको. खिल्ली उडवणे तर नक्कीच नको
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply