नवीन लेखन...

गरज म्हणोनि सेवा घडते (सुमंत उवाच – भाग ८१)

गरज म्हणोनि सेवा घडते

घडते सेवा दुसऱ्यास मेवा

परी पुरुनी जातो स्वाभिमान येथे

तयाचा अभिमान का बाळगावा!!

अर्थ

संकटे येता घरा, सावध असावे! स्वतःस वेळ देऊनी, साऱ्यांस थोडेच दिसावे!! असे म्हणताना त्याचा नेमका अर्थ लागला नाही तर मात्र आपण दुसऱ्याच्या आयुष्यातले खेळणे तर बनून रहात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रत्येकावर आयुष्यात अशी वेळ येते की स्वतःला वेळ देणे आणि स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते पण, स्वतःला मानसिक स्थेर्य देण्याच्या नादात आपण दुसऱ्या कोणाच्या हाता खालचे मांजर नकळत बनत नाही ना हे कोण तपासतो? आणि जर का तसे घडत असेल आणि तेही स्वतःच्या मर्जीने तर आपण मूर्ख आहोत हे मान्य करावे निदान तेवढे स्वीकारणे जमले पाहिजे.

तुम्ही करीत असलेले कार्य, कर्म, नोकरी, व्यवसाय, छंद काही असेल पण ते करताना आपल्या शारीरिक सबलतेकडे पहाणे महत्वाचे असते. गरज या शब्दापुढे चांगले कार्य आणि वाईट कर्म घडू शकते तेवढी क्षमता या शब्दात नक्कीच आहे. आपण कोठे थांबायचे आणि स्वतःला महत्व किती द्यायचे हे समोरचा ठरवत नाही तर ते आपण स्वतः ठरवले पाहिजे.

ट्रेकिंग करताना एक पाऊल जर चुकीचे पडले तर अपघात घडू शकतो म्हणून आपण झेपेल तेथ पर्यंत जावे पुढे न गेले तर स्वाभिमान दुखावण्याचा प्रश्नच येत नाही पण जर इतर साथीदार सांगत असूनही जर आपण पुढे गेलोच आणि अनावधानाने काही विपरीत घडलेच तर त्यात दोष हा सर्वस्वी स्वतःचा हे लक्षात ठेवावे. आपल्या गरजेपोटी उचलल्या गेल्या क्रियेमुळे दुसऱ्यास अपाय तर होणार नाही ना हा विचार मनात आला की सारे नीट होते कारण नंतर ती क्रियाच घडत नाही. आणि या साठी मनावर ताबा मिळवणे फार आवश्यक आहे.

शेवटी एवढंच, की सुखं-दुःखं हे जगण्याच्या गाडीची दोन चाके आहेत. त्यांना एकत्र घेऊन जाणे चांगले जर आपण कोणा एका चाकावर जास्त भर दिला तर दुसरे हे त्रास देणारचं. गरज हा वेग वाढवतो पण त्याचा ब्रेक मनाच्या खंबीरतेवर अवलंबून असतो आणि त्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा दोर स्वतः कडे असणे गरजेचे. नाहीतर………. सूज्ञास अधिक न सांगणे.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..