कविवर्य सौमित्र यांची माफी मागून.. विडंबन.
थंडी जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं…
दरवर्षी लग्नाचं स्वप्न उबदार मनात दाटतं.
तरी भावना चाळवत राहतात.
मन चाळवत नाही.
या एकांतात सिंगलतेशिवाय कुणीच बोलत नाही.
इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते..
इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते…
आपण पाहत नसलो तरी पदर नीट घेते.
नवरा तिचा जाडा, टकला डोळे वटारून बघत राहतो…
आपण फक्त डोळे झाकून हात चोळत जगत राहतो.
संध्याकाळ टळून रात्रीचा सुरू होतो पुन्हा खेळ…
आपल्या शिकोटीत शिरत राहते गार गार कातरवेळ.
चक्क डोळ्यांसमोर मित्र लग्न करून येतो.
दरवर्षी देव आपली अशी का परीक्षा घेतो.?
दत्तात्रय श्रीकांत गुरव
मोबा. -8605523618
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
Leave a Reply