नवीन लेखन...

वायुगळती

२००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट ” थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला लागले, घशापाशी जळजळ झाली. बरेच दिवस तेथील प्रदूषणं-नियंत्रकांना हा उपद्रव नेहमीप्रमाणे मोटारकारच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होतोय असे वाटले. पण अमेरिकन वैज्ञानिक राथर याने केलेल्या संशोधनातून त्याला जे आढळून आले ते आश्चर्यजनक होते. शहरात वापरल्या जाणाऱ्या लाखो एल.पी.जी. सिलेण्डरमधून त्या काळात गळणाऱ्या वायूमुळे तसेच हे सिलेण्डर ज्या टाकीतून भरले जातात त्या टाकीतूनही गळती होते, त्याचा हा एकत्रित परिणाम होता. त्यांचे हे निष्कर्ष त्यांनी प्रख्यात विज्ञान मासिक सायन्समध्ये छापले. तोवर सरकारने मोटारगाड्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले होते, पण त्या वेळी एल.पी.जी. सिलेण्डर हा मुद्दा त्यात नव्यानेच आला.

१९९५ सालाच्या सुमारास दिल्लीत मोटारगाड्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा महत्त्वाचा होता. पण नंतर तेथे गाड्यांना नॅचर गॅस सक्तीचा झाल्यावर ते प्रदूषण कमी झाले. तोच प्रयोग मुंबईत केल्यावर येथेही तो यशस्वी झाला. मेक्सिको शहरात २००३ साली २० लाख टन एल.पी.जी. वापरला गेला. तेथे स्वयंपाकघरातील इंधन आणि घरे गरम करण्यासाठी इंधन म्हणून एल.पी.जी. वापरला जातो. मुंबईत घरे गरम करावी लागत नसल्याने एवढा एल.पी.जी. लागत नाही. शिवाय तेव्हा मेक्सिकोची लोकसंख्या २ कोटी होती, तर आता २०१४ साली मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आहे. ‘पेमेक्स’ नावाची कंपनी मेक्सिकोत एल.पी.जी. वायू विकत असे. त्यांनी या वायूचे ज्वलनाचे गुण तेच ठेवून हा वायू हवेत पसरला तरी तो उपद्रवकारक होणारा नाही म्हणून संशोधन सुरू केले. शेवलांड नावाच्या शास्त्रज्ञाने १९९२ ते १९९५ मध्ये घेतलेल्या मेक्सिको शहरातल्या हवेचे २०० नमुने गोळा केले आणि त्यात एल.पी.जी. चे घटक असलेले ब्यूटेन आणि प्रोपेन सापडले. दिल्लीला दाट धुके असते. अशा प्रदूषणापासून जपायला हवे.

अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..