नवीन लेखन...

 गतकर्माची विस्मृती

एके दिनीं निघून जाईन    निरोप घेवून ह्या जगताचा

प्रवास माझा अनंतात    कसा असेल त्या वेळेचा

 

आकाशाच्या छाये खालती    विदेही स्थितींत  फिरत राहीन

‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी   गत कर्माचे करिन मापन

 

बाल्यातील चुका उमगल्या     तरूणपणाच्या उंबरठ्यावरी

सळसळणारे यौवन रक्त    वृधावस्तेतील खंत ठरी

 

पूनर्जन्म घेण्याकरितां    गर्भाची निवड करीन

गत जन्मींच्या चुका टाळूनी    आदर्शमय  जीवन जगेन

 

शंकेची परि पाल चुकचुके    राहील का स्मृति गत जन्माची

नसतां पूनरपि चक्र फिरेल    विस्मृति होतां गत कर्माची

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..