नवीन लेखन...

गायत्री मंत्र आणि आयुर्वेद

कित्येक दुकानात सकाळी पूजा वगैरे झाल्यावर मांगल्यमय वातावरण निर्माण करण्याकरता काही मंत्र लावले जातात. दुर्दैवाने यात विचित्र चालीत बसवलेला गायत्री मंत्रदेखील असतो. विचित्र चाल असे म्हणायचे कारण म्हणजे मुळात गायत्रीला स्वतःची अशी लय आहे; तिला उसनवारीची आवश्यकताच नाही. त्यातही गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं?

हा जप ‘मनातल्या मनात’च का? कारण गायत्री ही शक्ती आहे. ती तेजाची उपासना आहे. आयुर्वेदानुसार विचार करता हा मंत्र उष्ण असल्याने पित्त वाढवणारा आहे. याकरताच त्याचे वैखरी वाणीत उच्चारण नको. स्त्रियांनी गायत्री जप करू नये असे मत आढळते ते याचमुळे; इथे लिंगभेद वा पुरोगाम्यांचं नेहमीचं रडणं असलेली पुरुषप्रधान संस्कृती वगैरे कारणीभूत नसून स्त्रियांच्या आरोग्याचा विचार आहे. आयुर्वेदानुसार स्त्रियांमध्ये अग्नी महाभूत अधिक प्रमाणात असल्याने त्यांनी आपल्या शरीरात उष्णता वाढू नये याची काळजी घेणे अपेक्षित असते. त्यातही भारतीय तत्वज्ञानानुसार वाणीची उत्पत्ती कंठात नसून नाभीपटलापासून सांगितली आहे. उष्ण मंत्राच्या पठणाने नाभी आणि आसमंतात उष्णता निर्माण होते. आसमंतातील परिसर म्हणजे स्त्रियांचे गर्भाशयादि अवयव असल्याने तिथे उष्णता निर्माण होऊ नये याची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. हा सारा कार्यकारणभाव यामागे आहे.

गायत्री मंत्राबद्दल बोलणे हा माझा अधिकार नाही. मात्र या लेखात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याचा उहापोह केला आहे हे लक्षात घ्यावे. ज्यांना ‘मंत्र वगैरे काही नसतं’ असा वाटतं त्यांनी कृपया पोस्टकडे दुर्लक्ष करावे. मात्र मंत्रशक्तीवर विश्वास असणाऱ्या लोकांनी इथे मांडलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा.

 

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदीय वंध्यत्व उपचारतज्ज्ञ
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Aug 22, 2016

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..