नवीन लेखन...

गझलकार प्रदीप निफाडकर

मराठी गझलकार प्रदीप निफाडकर यांचा जन्म २ जुलै १९६१ रोजी झाला. ‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर.

प्रदीप निफाडकर यांनी प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेत वात्सल्यता व आध्यात्मिकता आणली. ते पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे. ‘वेगळे वाटसरू’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनाथ मुलांच्या भविष्यावर नजर टाकणार्‍यात मालिकेचे‘आभाळ पेलणारे आयुष्य’ हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

प्रदीप निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली होती. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘गझलसम्राट सुरेश भट आणि…’ हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तत्पूर्वी भट यांच्या अप्रकाशित कवितांचे संपादन करण्याचे भाग्य निफाडकर यांना लाभले. ‘रसवंतीचा मुजरा’ असे त्या पुस्तकाचे नाव असून, नागपूर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्याचे प्रकाशन झाले होते.

भारतातील सर्व भाषा तसेच नेपाळी, इंग्रजी भाषेतील ‘आई’ या विषयावरील कवितांचे संपादन श्री. निफाडकर यांनी केले, त्याचे ‘माँ’ नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील ८५ नव्या दमाच्या मराठी गझलकारांच्या निवडक गझलांचे ‘आवडलेल्या गझला’ या पुस्तकाचेही संपादन त्यांनी केले आहे. ‘मै शायर’ हे त्यांचे ३५ शायरांवरील पुस्तक बहुचर्चित आहे.

निफाडकर यांच्या मराठी गझलांची ‘देखणी’ ही ध्वनिफीत एच. एम.व्ही. कंपनीतर्फे प्रकाशित झाली आहे. इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात त्यांच्या गझलेचा समावेश झाला असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वृत्तविद्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात त्यांनी भरपूर लेखन केले आहे. त्यांच्याविषयी व त्यांच्या गझलांविषयी लेखांचे एक पुस्तक ‘मराठी गझल : प्रदीप निफाडकर’ या नावाने आले आहे. नुकतेच त्यांच्या कवितांचे एकमेव शीर्षकाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या गझलांचे पुस्तक ‘गझलधाम’ हे, श्रीविद्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. प्रदीप निफाडकर यांनी ‘मोहिनी’ व ‘स..सासूचा’ या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.

‘मी मराठी’ या वाहिनीच्या ‘सलाम नाशिक, सलाम नागपूर व सलाम कोल्हापूर’ या कार्यक्रमांचे शीर्षक गीतलेखन निफाडकर यांचेच होते.

प्रदीप निफाडकर यांना आतापर्यंत राज्य उर्दू अकादमीचा विशेष पुरस्कार, कै. भाऊसाहेब पाटणकर स्मृती, उर्दूमित्र, वैष्णवमित्र, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारिता, रामसुखजी भट्टड पुरस्कृत कै. दादासाहेब पोतनीस आणि दै. देशदूततर्फे ‘गुणवंत’, साहिर लुधियानवी व बलराज सहानी फाउंड़ेशनचा ‘जाँ निसार अख्तर पुरस्कार’ असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘स्वप्नमेणा’ या गझलसंग्रहास नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून ‘प्रभाकर वैद्य पुरस्कार’ तर ‘गझलदीप’ पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ‘साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे.

‘सकाळ’,‘लोकमत’,‘देशदूत’ अशा वृत्तपत्रांमध्ये तब्बल २६ वर्षे त्यांनी काम केले. उपसंपादकापासून कार्यकारी संपादकापर्यंत त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

‘गझलदीप’ हा त्यांचा मराठी गझलांचा स्वतंत्र कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये झाला आहे.

अमरावती येथे १९८९ ला झालेल्या संमेलनापासून अखिल भारतीय संमेलनात त्यांचा सातत्याने निमंत्रित कवी म्हणून सहभाग आहे. दुबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुण्याहून फक्त त्यांनाच निमंत्रित केले होते. मुक्ताईनगर येथील अखिल भारतीय उर्दू मुशायर्यालत अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली आहे. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कवी असून दूरदर्शन व विविध वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. ‘काव्यदीप‘ नावाचे खास कवितेचे मासिक त्यांनी दोन वर्षे चालविले आहे. उर्दू साहित्य परिषदेचे ते बिनविरोध निवडून आलेले पहिलेच मराठी भाषक अध्यक्ष होते.

संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..