मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. गीता संपूर्ण जगताची आई आहे. व मार्गदर्शक सुद्धा आहे. गीतेत नुसते धर्मशास्त्र न सांगता कर्मयोग, ज्ञानयोग वगैरे सांगितले आहे. संपूर्ण मानवधर्माचे स्वरूप गीतेत सांगितले आहे. सर्वच भाषांत हिचा अनुवाद झालेला आढळतो. या गीतेनंतर अनेक गीता लिहिल्या गेल्या जसे रामगीता, शिवगीता, गुरुगीता वगैरे. परंतु भगवद्गीतेएवढी मानमान्यता अन्य गीतेस मिळालेली आढळत नाही.
Leave a Reply