रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी
जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ//
अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती
सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी
कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१//
जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी
कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते
सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते त्याची
तूं आहेस अर्जुना सोंगटी प्रभू ईच्छे फिरे पटावरी //२//
जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी
कर तूं, नसे तुझे ते कर्म हा आहे केवळ प्रभूधर्म
सोडून द्यावीस फलआशा न येई केव्हां तुज निराशा
तत्वे सांगुनी आर्जुनासी संशय त्याचा दूर करी //३//
जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी
विचार कर तूं आहेस कोण जाणार कोठे, येई कोठून
चक्रे फिरती अनेक तूं आहेस त्यातील एक
स्वतंत्र असूनी कांही अंशी अवलंबून तूं दुजावरी //४//
जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी
गीता सांगे अपूर्व ज्ञान जीवनाची करी उकलन
प्रश्न त्यांचे सारे सुटती आत्मचिंतन जेव्हां करिती
केवळ समजतां गीतेला खरें समाधान लाभे उरीं //५//
जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply