गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट ‘पारसमणि’ मधील इन्दीवर यांची गाणी गाजली.
निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. ‘उपकार’ मधील “क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या…” ही गाणी काय किंवा ‘पूरब और पश्चिम’ मधील “दुल्हन चली वो पहन चली” और “कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे” ही गाणी तर अजून ही अवीट वाटतात मा. इन्दीवर यांनी संगीतकार जोड़ी कल्याणजी-आनंदजी च्या बरोबर “छोड़ दे सारी दुनिया किसी के लिये…”, “चंदन सा बदन…” और “मैं तो भूल चली बाबुल का देश…” अशी सुंदर गाणी लिहिली आहेत.
राकेश रोशन यांच्या चित्रपटात इन्दीवर यांनी सदाबहार गाणी लिहिली. ‘कामचोर’, ‘ख़ुदग़र्ज’, ‘खून भरी मांग’, ‘काला बाज़ार’, ‘किशन कन्हैया’, ‘किंग अंकल’, ‘करण अर्जुन’ व ‘कोयला’ या राकेश रोशन यांच्या चित्रपटातील गाणी मा.इन्दीवर यांनी लिहिली. त्यांच्या या गाण्या मुळे राकेश रोशन यांचे चित्रपटातील गाणी आज आपण आठवणीने ऐकतो. विजय आनंद यांच्या ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटातील “नफ़रत करने वालों के सीने में…”, “पल भर के लिये कोई हमें…” ही गाणी मा.इन्दीवर यांचीच.
मनमोहन देसाई यांच्या ‘सच्चा-झूठा’ या चित्रपटातील “मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां…” हे इन्दीवर यांचे गाणे आज ही लग्नात वाजवले जाते. ‘सफ़र’ या चित्रपटातील इन्दीवर यांचे “जीवन से भरी तेरी आंखें…” व “जो तुमको हो पसंद…” ही गाणी तर लाजबाब.
१९७५ मध्ये ‘अमानुष’या चित्रपटासाठी इन्दीवर यांना ‘फ़िल्म फेयर पुरस्कार’ मिळाला. इन्दीवर यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. २७ फेब्रुवारी १९९७ मा.इन्दीवर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
इन्दीवर यांनी लिहीलेली काही गाणी
दिल ऐसा किसीने मेरा तोडा
फुल तुम्हे भेजा है खत में
गरजत बसरत
जिंदगी का सफर
चंदन सा बदन
जो तुमको हो पसंद
मधुबन खुशबु देता है
एक तु जो मिला
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
एक बार तु कहदे
इस दिल मे बसा था प्यार तेरा
ओठों से छु लो तुम
कोई जब तुम्हारा
दिल एैसा किसीने
Leave a Reply