सर लुडविग गुट्टमॅन यांचा जन्म ३ जुलै १८९९ रोजी टोस्ट जर्मन येथे झाला. (आता पोलंड मध्ये आहे.)
जेव्हा गुट्टमॅन तीन वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब सिलेशियनमध्ये मध्ये शिफ्ट झाले. याच शहरातून त्यांनी १९१७ मध्ये माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले. १९१८ मध्ये त्यांनी आपला मेडिकलचा अभ्यास सुरु केला. १९२५ पासून ते न्यूरोसर्जन म्हणून काम करू लागले होते आणि त्याचबरोबर युनिवर्सिटीजमध्ये लेक्चर देखील देत असत.
लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच, २९ जुलै १९४८ रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटल मध्ये युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते. यामधील सर्व सहभागींना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. या सर्वांनी व्हीलचेअर्समध्ये भाग घेतला होता. आपल्या रूग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लुडविग गुट्टमन यांनी ‘पॅराप्लेजिक गेम्स’ हा शब्द वापरायला सुरुवात केली. त्यानंतर हा ‘पॅरालंपिक खेळ’ म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे १९५२ पर्यंत, १३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी स्टोक मॅंडेविले गेम्समध्ये सहभाग नोंदवला होता.
१९५६ च्या स्टोक मॅंडेविले गेम्समध्ये, गुट्टमॅन यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ‘सर थॉमस फेर्नली चषक’ देऊन सन्मानित केले. १९६० साली रोममध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक सोबतच ‘आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स’चे आयोजन केले गेले. हे ९ वा वार्षिक आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स म्हणून ओळखले गेले. त्यांनी १९६१ मध्ये ‘ब्रिटीश स्पोर्टस असो फॉर डिसएबल’ ची स्थापना केली.
गुट्टमॅन यांचे १८ मार्च १९८० रोजी निधन झाले. त्यांच्या जन्मदिनी गेल्या वर्षी गुगलने लुडविग गुट्टमॅन यांचे डूडल केले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply