दहशतवादी कुठल्याही विशिष्ट आकाराने, वेषाने समोर येत नसतो. दहशतवाद्यांनी स्वत:चे लष्कर, नौदल वा वायुदल उभारलेले ऐकिवात नाही. त्यांचे गट अनेक देशांत अनेक हितसंबंधीच्या मदतीने काम करत असतात. त्यांची अशी लिखित/अलिखित घटना नाही. विचारसरणी नाही. अशा सर्वव्यापी, म्हटल्या तर अदृश्य, म्हटल्या तर दृश्य शक्तीच्या विरोधात काही देशांनी जागतिक युद्ध पुकारले आहे. दहशतवादी गटांबरोबर चर्चा, वाटाघाटी, करार शक्यच नाहीत. जगभर किमान २०-२५ गट आहेत. त्यांच्या या गटांमध्ये सामील होणारे तरुण मुख्यता स्वयंस्फूर्तीने किंवा विकृत प्रलोभनाने आणलेले असतात. त्यांचे भविष्य आणि त्यांच्या मातृभूमीचे, कुटुंबाचे हीत कश्यात आहे यांचा त्यांना विसर पडलेला असतो. कारण एक गोष्ट ते विसरतात की देश वाचला तर आपण वाचू आपले कुटुंब वाचेल, आपल्याला थोडीतरी किमंत असेल ही विचारसरणी खुंटलेली असते किंवा त्यावर नकोत्या विचारांचा पगडा आहे.
जगभरात तसे बऱ्याच देशात विविध नावांनी दहशतवाद्यांचे गट-तट आहेत. परंतु सध्या जास्त चर्चा किंवा उत्पात इसीस याच दहशतवादी गटाचा आहे. त्यांनी सिरीया आणि इराक या दिशात उच्छाद मांडला आहे तसेच आफ्रिकेत बोकोहराम यांचाही सुळसुळाट आहे. आणि याचा परिणाम स्वरूप त्या देशातील किंवा आजूबाजूच्या राष्ट्रातील जनता/नागरिक या जाचाला कंटाळून युरोप, अमेरिका देशात निर्वासित म्हणून पळ काढत आहेत. काही उदार देशांनी त्यांना आसरा देऊ केला पण त्यात त्यांच्या बरोबर अतिरेकीही घुसले आणि त्यांनी त्या देशातील नागरिकांचे जगणे नकोसे करून सोडले. याला कोण जबाबदार?
मला वाटतं याची सुरुवात जर्मन चान्सेलर अन्जला मर्केल यांनी केली असे म्हंटले तर चुकीचे ठरू नये. अन्जेला मर्केल यांना निर्वासितांबद्दलची वाटणारी काळजी, आपुलकी, प्रेम हे सगळे जरी तूर्तास बरोबर वाटलं तरी त्यांचा निर्णय हा त्यांच्या देशासाठी आणि युरोपातील इतर देशांसाठी नक्कीच कटू आहे. त्याचे परिणाम त्यांच्या देशातील नागरिक आणि युरोपातील बहुतेक राष्ट्र भोगताहेत हे रोजच्या दैनिक प्रत्यक्ष मधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यातून दिसत आहे. निर्वासितांबाबत अतिउदार धोरण स्वीकारणाऱ्या युरोपीय देशांवर रशियन राष्ट्राध्यक्षांनी घणाघाती टीका केल्याचे ५ नोव्हेंबर, २०१६च्या दैनिक प्रत्यक्षमध्ये वाचायला मिळाले तसेच त्यामध्ये त्यांनी दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इराकी निर्वासिताची ऑस्ट्रियाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. एका वेगळ्या विषयावर बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की ही रशिया युरोपात फूट पडण्याचा प्रयत्न करीत आहे कदाचित अश्या टीका-टिप्पणी युरोपातील काही देशांतर्गत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून असतात. असो.
२०१७ मध्ये जर्मनीत होणाऱ्या निवडणुकीत श्रीमती अन्जेला मर्केल निवडून येतील की नाही याची शाश्वती नाही. आत्ताच उघडउघड त्यांच्या विरोधात नागरिक जाताना दिसत आहेत. एक चांगल्या राजकारणी असलेल्या श्रीमती मर्केल यांच्यावर अशी वेळ यावी? अर्थात निर्वासितांच्या बाबतीत घेतलेले काही निर्णय चुकलेच! असे म्हणावे लागेल.
२४ ऑक्टोबर, २०१६च्या दैनिक प्रत्यक्ष मधील आंतरराष्ट्रीय सदरात ‘जर्मन नागरिकांचे देश सोडण्याचे प्रमाण वाढले’ या मथळ्याची बातमी वाचून मनात वेगळ्या कारणांसाठी पाल चुकचुकली कदाचित युरोपातील इतर देशांना भविष्यातील इशारा घंटा असावी असे वाटून गेले. असो.
काही जर्मन नागरिकांनी कदाचित हा टोकाचा आणि उद्विग्नेतून घेतलेला निर्णय असू शकेल परंतु याने त्यांची आणि देशातील इतर नागरिकांची समस्या सुटणार आहे का?
काही महिने आणि वर्षात जर्मनीत धडकलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे तसेच देशात घडणाऱ्या अनुचित बदलांना कंटाळलेल्या तब्बल एक लाख ३८ हजार जर्मन नागरिकांनी देश सोडून इतर देशांमध्ये स्थलांतर केले आहे असे ‘डिस्टॅटिस’ या जर्मनीतील यंत्रणेने दिलेल्या माहिती वरून कळते.
निर्वासितांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार्य हंगेरीसारख्या देशाला जर्मन नागरिकांची पसंती असल्याचे अहवालातून समोर आले आहे. पश्चिम हंगेरीमधील काही भागांमध्ये जर्मन नागरिक स्थायिक होण्याचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक रिअल इस्टेट एजंटच्या माहितीवरून स्पष्ट होते. काही नागरिक अमेरिकेत स्थाईक होऊ पाहत आहेत अश्याने त्यांच्या देशातील समस्या सुटण्यास मदत होईल की अतिरेक्यांचे आणि निर्वासितांचे फावेल हा कळीचा मुद्दा आहे.
असेच निर्वासित येत राहिले तर भविष्यात सर्व युरोपीय देशांच्या समाजकारणाचे आणि अर्थकारणाचे गणित बदलून जाईल. एकंदरीतच जर्मनीत वातावरण खूप तापले आहे आणि त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. जगभरात इसीस आणि इतर अतिरेकी संघटनांची हीच चाल आहे की आपण काही न करता देश रिकामा होत असतील तर चांगलेच आहे. मग तेथे इतर देशातील नागरिकांना पिटाळून त्यांच्याबरोबरीने काही हजार अतिरेकी घुसवून परत त्या देशात दहशत निर्माण करायची. हे न सुटणारे कोडे आहे.
या सर्वांच्यापाठी फार मोठा इतिहास आहे. काही बडे देश आणि त्यातील काही बडे नेते यात गुंतल्याचे किंवा त्यांचा त्याला मूक पाठींबा आहे असे बोलले जाते. कारण काही मिळविण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply