MENU
नवीन लेखन...

गेट टुगेदर 

शाळेच्या ग्रुप चे आधी रियूनियन आणि मग नियमित – अनियमितपणे होणारी गेट – टुगेदर हा दिलासा असतो , हुरहुर असते की अंतर्शोध – अंतर्नादाला निमंत्रण असते ?

 

हा प्रश्न अलीकडे फार वेळा पडतो मला ….

तू गेट -टुगेदरला असलास तरी आणि नसलास तरीही …

 

तसे आपण सगळेच एकाच वर्गात ….

तू , मी , सतीश तर अगदी पोस्ट – ग्रेजुयेट होईपर्यंत बरोबर …

 

या गेट -टुगेदर मुळे आणि whatsapp ग्रुप मुळे बाकी सगळ्यांशी पुन्हा एकदा कनेक्ट झालो असलो तरी तसेही आपण तिघे एकमेकांशी आधी पासूनच कनेक्ट आहोत ….अगदी दररोज भेटत आणि बोलत नसलो तरी….

 

त्यातून होत इतकेच की मनोमन अनेकदा अनेक गोष्टी आठवत राहतात , मनात येत राहतात ….

 

आता हे सगळं सांगायच कारण म्हणजे आत्ताच वाचलेली तुझी ” बांगडी ” ही कविता ….

 

” बागडणयाचे वय वेगळे असते

बागडणयाचे रूप वेगळे असते

बांगडी तीच आणि तशीच असते .

 

बांगडी पिचण अशुभ असते

पण कधीतरी ते हवहवस असते

बांगडी तीच आणि तशीच असते .

 

बांगडी प्रुथ्वी सारखी  फिरते

जागीच आणि स्वतःभोवती फिरते

बांगडी तीच आणि तशीच असते .

 

बांगडी भोवरा नसते

दिसते तितकी सोज्वळ नसते

बांगडी नेमकी काय असते ” .

 

हे वाचले आणि मनात आले की हे म्हणजे vintage तू ….

सर्रकन किती गोष्टी आठवल्या

होत्याच …

आता अगदी उचंबळून आल्या ….पुन्हा .

 

हेच बघ ना …

परवा आपल गेट – टुगेदर होते . तू येणार नव्हतास . तू तस आधीच कळवले होतेस …तरीही भाबडी आशा होती ..

पण मीनाच्या घराच्या दारात पोचले तरी फारसे आवाज येत नव्हते …आणि मग मात्र खात्री पटली की तू नाहीस आज …

जणू काही हे कमी नव्हते म्हणून दारातच सतीश उभा …मी काही म्हणायच्या आधीच तो मला म्हणाला की तू आज येणार नाहीयेस …

क्षणभर खूप राग आला ..की हा कोण लागून गेला ..आपण आहोत ना सगळे ….

पण कितीवेळा जाणवत राहिले त्यादिवशी की तू नाहीयेस …सगळ्यानाच

आणि मनोमन मलाही …तेंव्हा एकदाही मोकळेपणाने तसं म्हणलं नाही तरी …

मीना तर म्हणली सुद्धा की तू असतास तर तिला सारखे सांगितले असतेस की ते सगळे पदार्थ बाहेर आणून ठेव …निष्कारण आत – बाहेर करू नकोस ….

 

******

त्यादिवशी  गेट -टुगेदर नंतर मी आईकडेच राहणार होते .त्यामुळे अगदी रमतगमत जात होते …आपल्या शाळेचा चौक क्रॉस करताना मला पुन्हा आठवले ….पावसाळ्यात तिथे पाणी साठायच …त्यात फिरायला तुलाखूप आवडायचं …

माझी आई तेंव्हा गंमतीने म्हणायची की तरुण मुलीला जस वेगवेगळ्या अँगल नी स्वतःला आरशात पाहायला आवडतं तस तुला त्या जोरात वाहणाऱ्या पाण्यात फिरायला आवडत ….

मग हेही आठवल की अगदी अलीकडे मी तुला कशावरून तरी हे वाक्य सांगितले होते आणि तुला विचारलं होत की तुला अजूनही अस जोरात वाहणाऱ्या पाण्यात फिरायला आवडत का आणि ते का आवडत

….

तुझ त्यावरचे उत्तर तर मी कधीच विसरणार नाही …

तू म्हणाला होतास …” हो .अजूनही खूप आवडते . कारण मुळात वाहत पाणी आवडत …सतत पुढे जात राहणारे …कधी वाटेत आलेले खड्डे भरून , तर कधी ते टाळून …मला तस वाहत राहायचं आहे …”

वेडा आहेस रे ….

आणि वेड करतोस रे ….

कारण तुझी अशी उत्तरं कधीच नाटकी आणि क्रुत्रिम वाटत नाहीत रे ”

 

त्या रात्री मी आईकडे लग्नाआधीच्या माझ्या खोलीत झोपले होते …

माझ्या भाची बरोबर ..

तीच्या टेबलावर तुझी पुस्तके होती …ती मी सहजच चाळत असताना भाचीने विचारले की तू आणि मी बरीच वर्षे एका वर्गात ….तीला तिच्या बाबांनी सांगितले ….

 

रात्री सहज आठवत होते आपले शाळा – कॉलेज चे दिवस ….

तू आणि माझा दादा खेळून आमच्या घरी यायचात आणि मग कपडे बदलून क्लास ला जायचात .

दादाच्या खोलीत तुम्ही शर्ट बदलत असताना मी तिथे आले तरी तू कधीही माझ्या खोलीत यायचा नाहीस …मी नुसते केस सारखे करत असले तरी ….विशेषतः मी ललितची प्रेयसी आहे असे तुला कळल्यानंतर कधीचनाही …नेहमी तू हॉल मधे बसूनच माझ्याशी बौलायचास ….

नंतर कितीतरी वर्षानी मी तुला एकदा विचारलंही होत …तेंव्हा तू हसून म्हणाला होतास …” जे आपले नाही , त्याचा मोह होता कामा नये ; अगदी क्षणभर सुद्धा . मी काही संत नाही . त्यामुळे जिथे जायचंच नाहीये ,त्याच्या रस्त्यावर पाऊल तरी कशाला टाकायचे ? ”

 

त्या रात्री भाचीला झोप लागली तरी मला नाही . तुझ्या या स्वभावाची मलाच काय , माझा नवरा ललितलाही पूर्ण खात्री आहे .

आज मला स्वतःला तरुण , सुंदर मुलगी आहे , त्यामुळे तर मला याच खूप अप्रूप , महत्वाच …..

 

*******

 

भाचीच्या शेजारी मी आडवी पडले त्यारात्री …तेंव्हा मला अजून एक गोष्ट आठवत होती …. लग्नाचे प्रेज़ेंट म्हणून तू मला जोडवी दिली होतीस ….

मला जोडवी जरासूद्धा आवडत नाहीत आणि मी ती कधीही घालणार नाही हे तुला पक्के माहीत असून सुद्धा ….

आणि माझ्या नवऱ्यालाही जोडवी घातलेली आवडत नसल्याने तो प्रश्नच मिटला .

पण तरीही ती जोडवी मी माझ्या नकळत इतकी वर्षे जपून ठेवली आहेत ….

पूर्वी ती डबी घरच्या कपाटाच्या तिजोरीच्या कोपऱ्यात असायची ….

आता काय आणि का ते नाही माहीत पण दररोजच्या पर्सच्या आतल्या खणात …

 

******

परवा अजून एक ….

 

ऑफिसात सतीशचा दुसऱ्या कामासाठी फोन आला होता  .बोलण्यात तुझा विषय आला होता .

पण एकंदरीत तो दिवस खूप हेक्टिक गेला होता .

घरी यायलाही खूप उशीर झाला होता .

जाम दमले होते .

आणि वैतागून गेले होते .

रात्री उशिरा घरी पोचले तेंव्हा लेक तिच्या ग्रुप बरोबर ट्रेक ला गेली होती .तिने ते आधीच सांगितले होते .

नवरोबा क्रिकेट पाहाण्यात दंग होते …tv चा आवाज सॉलिड मोठा ….कारण त्याचा विराट तूफान खेळत होता ….

इथे याची अनुष्का दमून आल्याच काहीच सोयर – सूतक नव्हते ….

तसं हे द्रुष्य आता मला सरावाचे आहे …..

 

पण त्यादिवशी काय झाले माहीत नाही …

फ्रेश होताना अचानक मनात आले की ललितच्या ऐवजी तू माझा नवरा असतास तर ….

आणि मग एक चित्र सहज मनात उमटले …

 

मी अशी उशिरा , वैतागून , दमून घरी आल्यावर तू दारात माझ्या हातातली पर्स नक्की घेतली असतीस .

TV बंद नसता झाला पण आवाज कमी जरूर झाला असता .

मी फ्रेश होईपर्यंत तिपॉय वर तुझा कॉफीचा मग आणि माझ्यासाठी बीअरचा ग्लास तयार असता …

मी सेटल होतांना tv चा आवाज mute झाला असता ….

पहिली दोन – तीन मिनिट तू काहीही बोलला नसतास ….फक्त एकटक माझ्याकडे बघत बसला असतास ….

मग नजरेनेच काय झाले म्हणून विचारले असतेस ….

मी बोलायला लागल्यावर माझ्या सोफ्याभोवती फिरत ऐकत राहायला असतास ….

मी बोलताना excite होत आहे असे तुला वाटल असत तर माझ्यामागे उभे राहात माझ्या खांद्यावर थोपटत राहीला असतास नाहीतर माझ्या हातातला थंडगार बियरचा ग्लास माझ्या गालाला लावला असतास ….

 

आणि मग आश्वासक सूरात म्हणला असतास ….” अस frustrate नाही व्हायच . क्षणिक किँवा तात्कालिक वाटणं अगदी साहजिकच आहे . पण हे विसरू नकोस की we have chosen this out of our own volition . So no complaints …””.

 

म्हणजे तू काही मोठा संत वगैरे नाहीयेस

 

आणि माझा नवरा ही काही सैतान नाहीये ……

 

हे वाचल्यावर तू हसून म्हणशील …” नवरा हा नवरा असतो  आणि मित्र हा मित्र असतो ….मी माझ्या बायकोशी असा वागलो असतो का हा खरा प्रश्न आहे . अग , लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर नवरेपण ही क्वचितचगाजवले जाते .”

 

हे खरे आहे ही आणि नाहीही रे …..

थोड समजून घे ना कधीतरी ….

 

तूला समजलय  पण ……

 

********

अजून एक ऐक ना …..

हल्ली गेट -“टुगेदर म्हणल ना की अजून एक नेहमी आठवत …..

गेट -टुगेदर संपवून बाहेर पडताना तुम्ही सगळे वर्गमित्र एकमेकाना मिठी मारता …आम्हा वर्गमैत्रिणिना नमस्कार करता  किँवा हन्डशेक करता  …..

या प्रक्रियेत तू माझ्यासमोर येतोस ….हन्डशेक करतोस …मी नकळत बघत राहते ….हात हातात ठेवून ….क्षण रेंगाळत राहावा अशी आस मनात बाळगून ….निदान थोडा तरी …

तू मिश्किल हसून रोखून बघत जणू सांगतोस ….चलो , मिलते है फिर …..

 

हा ” फिर ” कधी आणि कसा यांच्या लपंडावाचे गेट – टुगेदर मग सुरू होते

 

हे सहवासाचे , मैत्रीचे ते क्षण , त्या क्षणांचे ते स्पर्श नंतर आठवत राहतात

मी तर त्यांना शोधत राहते

आणि मग मनात एक वेगळाच कलिडोस्कोप सुरू होतो …एक वेगळेच गेट- टुगेदर सुरू होते …..स्वतःच स्वतःशी गेट -टुगेदर …

 

म्हणून तर म्हणल मी की गेट -“टुगेदर हा दिलासा , विसावा की नवी हुरहुर …..

गेट -टुगेदर च गेट -टुगेदर …

 

असाच राहशील ना आमच्या साठी

असून नसल्या सारखा

आणि

नसून असल्या सारखा

 

निदान माझ्यासाठी ….

 

चन्द्रशेखर टिळक 

६ मार्च २०१८ .

 

 

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..