आम्ही घाणा हा भरीला
आम्ही घाणा हा भरीला
(नाव) ताईच्या लग्नाचा ।।धृ।।
आम्ही घाणा हा भरीला
आम्ही घाणा हा भरीला
आधी वंदू कुलदेवीला
गजाननाला नमुनी
स्मरू आप्त पूर्वजांना …….. ।।१।।
आल्या काक्या, आल्या आत्या,
मावशी, मामी, ताई आल्या
आम्ही घाणा जो भरीला
आम्ही घाणा जो भरीला…….।।२।।
आम्ही घाणा हा भरीला
आम्ही घाणा हा भरीला
पहिली हळद कुटली
(नाव) ताईच्या कांतीला
आली पिवळी झळाळी…….।।३।।
आम्ही घाणा जो भरीला
गहू दळा सूप सूप
गव्हले करंज्या शेवया
करा रुखवत खूप, आम्ही……।।४।।
(नाव) ताईचे सासर
जसे नांदते गोकूळ
सासू सासरे नणंदा
दीर जावाही प्रेमळ, आम्ही…….।।५।।
तुपा दुधाच्या घागरी
(नाव) ताईच्या सासरी
तोटा नाही हो दह्याला
ताईच्या गावाला आम्ही …….।।६।।
ताईचे सासर (गावाचे नाव)
नाही बाई फार दूर
नको रडू (मुलीच्या आईचे नाव) बाई
आसू आवर आवर, आम्ही ……।।७।।
आम्ही घाणा जो भरला
साखरेचा मूठ मूठ
(नाव) ताई साजरी नवरी
गाली लावा गालबोट, आम्ही …..।।८।।
Leave a Reply