शिखरासही जिंक तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू……
येतील वादळे
भयान अती ते
भेद त्या वादळाला
आहेच रे अजिंक्य तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू……
घेऊन वारे पंखामध्ये
सामावून घे जग तुझ्यात
बनून यारा आसमंत तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू…….
अंधारी वाटा तुला
आल्या कधी कुठेही
हो अंधाराचाही अंत तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू…..
तुफान अडवण्याची
ताकद तुझ्यातच आहे
घे गरुड झेप तू
घे भरारी उंच तू
घे भरारी उंच तू
कवी – महेश सुखदेव पुंड
तामसवाडी,ता- नेवासा ,जि – अहमदनगर
मो – 8459043090
Leave a Reply