नवीन लेखन...

ठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती

देशात ज्या शहरांचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे त्यात ठाणे शहराचा क्रमांक खूप वरचा आहे. भारताच्या इतिहास पाहायचा झाल्यास भारतीय रेल्वेच्या प्रारंभापर्यंत तो जाईल. 16 एप्रिल 1853 मध्ये भारताची पहिली रेल्वे मुंबई बोरीबंदर होऊन निघाली, त्यावेळी त्यावेळी तिचे गंतव्य स्थान म्हणजेच डेस्टिनेशन ठाणे हे होते.  आजही गुंतवणूकदार, तंत्रज्ञ, व्यावसायिक,उद्योजक,सामान्य माणूस एवढेच नव्हे तर गर्भश्रीमंत माणसाचे डेस्टिनेशन हेच आहे.

घोडबंदर रस्त्यालगत हिरानंदानी समूहाने दोन दशकापासून आपला सहभाग ठळकपणे नोंदवला आहे हिरानंदानी इस्टेट या  प्रकल्पात स्टुडिओ अपार्टमेंट पासून दोन किंवा तीन  शयनगृहे  असणाऱ्या सदनिका उपलब्ध आहेत.सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रितपण देणाऱ्या या प्रकल्पाने केवल घरे उपलब्ध केलित असे नव्हे तर एक उत्कृष्ट जीवनपद्धतीच तेथे रुजवली आहे. हिरव्यागार वृक्षराजीने समृद्ध असलेल्या प्रकल्पात आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहेत.ब्रँडेड वस्तू,सौंदर्य प्रसाधने, औषधे यासाठी विविध रिटेल्स सज्ज आहेत.या प्रकल्प उभारणीपासूनच इथल्या माणसांच्या गरजा, सुविधा यांचा विचार केलेला आहे,त्यामुळेच उत्तम जागतिक पातळीवरचे शिक्षण ,वैद्यकीय सुविधा ,जिम, जलतरण तलाव यासारख्या सोयीही इथे उपलब्ध आहेत.विविध  सांस्कृतिक उपक्रमांनी उपक्रमाने इथले जगणे समृद्ध होत आहे.हिरानंदानी वन पार्कने आणखी एक उच्चभ्रू जीवन पद्धतीचा पर्याय उभा केला आहे.हिरानंदानी समूहाने यापूर्वी छोट्या घरापासून दोन ते तीन शयनगृहाच्या सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या आता त्यांची व्यापकता चार,पाच शयनगृहापर्यंत वाढली आहे.या प्रकल्पात उच्चभ्रू जीवनपद्धतीचा नवा आविष्कार साकारताना हिरानंदानी समूहाने आपल्याच दर्जात्मक परिमाणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत.याचाच अर्थ असा की ठाण्याची मुंबईशी असलेली जवळीक,प्रशस्त महामार्ग,उड्डाण पुलाची मालिका आणि शांत परिसर यांचा उपभोग घेण्यासाठी हिरानंदानी समूहाने आटोक्यात असणारे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत.

ठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क  यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो. रोजगार आणि व्यवसायाच्या भरपूर संधी असल्यामुळे अनेकांना मोठा प्रवासही करावा लागत नाही. हिरानंदानी इस्टेट या प्रकल्पात सात हजार कुटुंबे समाधानाने राहात आहेत. त्यांना या जवळच उपलब्ध असलेल्या या प्रकल्पात  120 इमारती पूर्णपणे भरलेल्या असून नव्या इमारतींची त्यात भर पडत आहे .उत्तम वातावरण निसर्गरम्य परिसर वाहतुकीचे विविध पर्याय आणि जगण्यातील आनंद वाढवणारा हा प्रकल्प निश्चितच सध्याच्या स्थितीत अधिक आग आवाक्यात आलेला आहे.

ठाणे हे शहर सातत्याने विकसित होत असून त्यात महाराष्ट्र सरकार, ठाणे महापालिका आणि संबंधित संस्था कार्यरत आहेत. उत्तम नियोजन, कार्यक्षम पूर्तता ही त्याची सूत्र होत.नवीन रेल्वे स्टेशन, गायमुख ते वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे याना जोडणारा उन्नत मार्ग,बोरिवली ते मुंबई असा भुयारी मार्ग हे मुंबई अधिक जवळ आणणार आहेत.मेट्रो 4 आणि 5 यातून प्रवास वेगवान आणि सुखद होणार आहे. हिरानंदानी समूह उद्याच्या सुविधा आजच देत आहेत. सुखाच्या घरासाठी गुंतवणूक हीच खरी गुंतवणूक होय.

— डॉ. निरंजन हिरानंदानी
अध्यक्ष, राष्ट्रीय घरबांधणी विकास समिती.(NAREDCO)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..