किचन क्लिनिक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेत आहोत. मग सुरूवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण आले आणि सुंठीची वैद्य ही नवी ओळख पाहूया तर !
आपण सर्वच जण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा,चटण्या आणी आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनी खाली उत्पन्न होतो, ओला असताना आले आणि वाळवलेली ती सुंठ. पण दोघांचे ही गुण वेगळे बरंका. सुंठ आणि आले दोन्ही चवीला तिखट आणि उष्ण गुणाचे पण गंमत बघाना आले अधिक प्रमाणात खाल्ले तर एॅसीडीटी वाढते तर सुंठ मात्र अपचनाने झालेली एॅसीडीटी कमी करते.
आले:
१)भुक लागत नाही का मग दररोज जेवणापुर्वी साधारणपणे १/२ तास आल्याचा छोटा तुकडा सैन्धव मीठासोबत खा आणी मग बघा पोटातील आगीचा वणवा कसा पेटतो ते.
२)सुका खोकला येत असल्यास एक चमचा आलेरस +२ च ओल्या हळदीचा रस+१ च मध हे मिश्रण घ्यावे.
३)आल्याच्या रसापासून घरगुती आलेपाक बनवा हा सर्दी,खोकला,भुक न लागणे,तोंडास रूचि नसणे ह्यावर रामबाण उपाय.
४)वाढलेले काॅलेस्टरोल सतावतेय का मग सकाळी उपाशी पोटी आल्याचा छोटा तुकडा आणि एक लसूण पाकळी नियमीत खा आणी ह्रूदयाचे आरोग्य चांगले ठेवा.
सुंठ:
१)सुंठी वाचून नाही पण सुंठीने खोकला घालवायचा असेल तर सुंठीची राख मधासह चाटणे खोकला दमा पळालाच म्हणून समजा.
२)शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सुज,मुरगळणे,मार लागणे,ह्यावर सुंठ आल्याच्या रसात उगाळून त्याचा गरम लेप त्या भागावर लावणे.
३)गळू पिकत नसेल तर सुंठपूड आणि खोबरेलतेल एकत्र शिजवा आणी सोसवेल एवढे निवल्यावर त्या गळूवर बांधा.
४)पोटात वात धरणे अथवा वारंवार आव पडणे ह्यावर घरी केलेला सुंठवडा उत्तम काम करतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply