रविवारला विदर्भ एक्सप्रेसने नागपुरवरुन कल्याणसाठी यायला निघालो.
नेहमीच खिडकीतुन कितीदा बाहेर बघत राहायचं.
तसा पाउसही नव्हता…बाहेरचं दृश्य.बघण्यासाठी….!
लॅपटाॅपवर’ विक्रम-वेधा ‘तामील चित्रपट बघणे सुरु केले..सुकु,म्हणजे माझ्या मुलीसोबत.
भाषेचा अडसर नव्हताच. सबटायटलमुळे कळत होतं.
पोलीस इंन्सपेक्टर , विक्रम( माधवन) एकाही निरपराध व्यक्तीला मारणार नाही असं म्हणणारा एन्काउंटर फेम अधिकारी…… छानच रंगवला..
तर गुंड वेधा….आपण का वाईट कामं करतो ..याची एकएक स्टोरी विक्रमला सांगत जातो.
पोलीस अन गुंड दोघांच्या खुन करण्यामागचं साम्य,पुसटंशी रेषा वारंवार दोघांच्या संवादात येत राहते..
शेवट मी सांगत नाही.,तुम्ही बघाच.
अकोला येण्याआधी चित्रपट बघुन झाला तोपावेतो चार्जींगही संपले होते.
जेवणंही झाले.
आता झोपावं म्हणून बर्थशिट लावणे सुरु केले.
वरच्या शिटवरिल काही जण आधीच झोपले होते.,त्यांनी आधीच लाईट बंद करायला लावला होता.
सुकुने शिटखाली ठेवलेली बँग बाहेर ओढली.
झीप ओढली.. मिठाईचे पाकेट दिसलेत..वाव, मावशीने नागपुरी संत्रीची मिठाई दिलेली दिसते
न सांगता ठेवलं असावं पाँकैट! सरप्राइज द्यायला!
मावशीचं कौतुक करत ..
एक मिठाईचा पुडा फोडला. एक तुकडा मला दिला.एक स्वतः खात.
बँगेतील चादर,बेडशीट काढू लागली
हे काय!
या चादरी आपल्या नाहीच.
अरेच्चा! ही बँगच आपली नाहीच तर!
तिच्या लक्षात अालं. चुकून दुसर्याची बँग उघडली गेली होती.
माझ्याही लक्षात आलं..
काय हा पागलपणा सुकू ?
एकसारख्या रंगामुळे,बँगेमुळे हे झालं..शिवाय अंधारामुळेही..
बँगवाला वर झोपलेला असावा.
बाजुला बसणार्याच्या लक्षात आले नाही.आमचा वेंधळेपणा.
लगेच आमच्या बँगमधुन बेडसशिट काढून काहीही न झाल्यासारखं सुकु नी मी आपापल्या बर्थवर लेटलो..
खुप हसु येत होतं…पण आजुबाजुला लक्षात येवू नये म्हणून तोंड झाकुन हसत होतो.
चुक तर झालीच होती. पण मुद्दाम लक्षात आणून द्यावी का?
बघू उठला झोपेतुन तर सांगू या! म्हणत
शिवाय आम्हाला कुठे माहीत होतं..बँग नक्की कोणाची होती ते!
चुकलं तर आमचं..!
कल्याण येईपावेतो वरचे दोघंही शीटवर मस्त झोपलेले..
आम्ही कल्याणला उतरलो.
पण काय करायला हवं होतं..?
सांगा तुम्हीच!
वेंधळेपणा वर हसाच तुम्हीही?
Leave a Reply