नवीन लेखन...

गॉडफादर(१९७२) / गॉडफादर-२(१९७४)

हॉलीवूडच्या इतिहासात काही विलक्षण सिनेमे बनले आहेत.
या सिनेमांनी पूर्ण जगभरात आपला प्रभाव पाडला आहे.
जगाभरात या सिनेमांचे चाहते आहेत..
पिढ्यान पिढ्या या सिनेमांची पारायणे होताहेत..
अशा सिनेमांमधला बिनीचा शिलेदार म्हणजे अर्थातच ‘गॉडफादर’.
गॉडफादर बद्दल प्रचंड अख्यायीका आहेत..
याच्याबद्दल लिहीले गेलय तितके फारच कमी सिनेमांबद्दल झालय
किंबहुना साडे चार दशके होउनही ही फिल्म बघितली जातेय..
आजही त्याच्यात ते अपील आहे..
याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत..
फ्रान्सीस फोर्ड कोप्पोलाचे जबरदस्त दिग्दर्शन..
मारीओ पुझोची अजरामर कादंबरी व त्यावर बेतलेली पटकथा…. ब्रँडो, डि निरो व पचीनो यांनी साकारलेल्या तगड्या भूमिका..
आणि या सिनेमाचे थीम म्युझीक.. निनो रोटाचे
निनो रोटा हा खरेतर एक इटालीयन संगीतकार..
इटालियन माएस्त्रो फ्रेड्रीको फेलीनी च्या सर्व सिनेमांचा संगीतकार..
कोप्पोला ने गॉडफादर च्या मुख्य थीम व पार्श्वसंगीत यासाठी निना रोटाला करारबद्ध केले.
चित्रपटाचा विषय इटालियन माफिया व कुटुंब यांशी निगडीत..
शिवाय चित्रपटाला असलेले सिसीली चे कनेक्शन..
(सिसीली हा इटलीचा तो कुप्रसिद्ध भाग जिथे माफियाचा उगम झाला)
हे सगळे समजून सिनेमात सिन-पूरक संगीत देणे आवश्यक होते..
अमेरिकेतले कथानक..त्याला वेगळे पार्श्वसंगीत..
कथा इटली सिसीलीला सरकली की वेगळे वाद्य व पार्श्वसंगीत..
शिवाय चित्रपटात कधी मधी डोकावणारी गाणी..
पुन्हा तीही इटालियन लेहेजा असणारीच..
या सर्व गोष्टींना निनो रोटा यांनी त्यांच्या संगीताने लिलया पेलले..
इतके की आजही साडेचार दशकांनीही गॉडफादर सिनेमाचे हे संगीत, ही थीम प्रचंड लोकप्रिय आहे.
पहिल्या भागात गॉडफादरच्या लाडक्या मुलीच्या म्हणजे कॉनीच्या विवाहात पहिल्यांदा ती आपल्या कानी पडते.
नंतर पहिल्या व दुसऱ्या भागात ही थीम वेगवेगळ्या स्वरुपात आंपल्या समोर येत राहते..
त्यातल्या प्रसंगानुरुप निना रोटा व कोप्पोला यांनी वाद्यांची निवड केली…

ट्रंपेट च्या रुपात व्हिटो कॉर्लिऑनीची आसहाय्यता आपल्याला भेटत राहते. कधी मँडोलीन बरोबर कॉर्लिओनी फॅमिलीचे इटालियन व सिसीली कनेक्शन दाखवत राहते. कधी ॲ‍कॉर्डिअन बरोबर ती आपल्याला सिसीलीला घेउन जाते. म्हणजे जसे ॲ‍कॉर्डिअन वाजू लागते तसे समजावे की आपण पुढच्या सिनमधे सिसिलीत जातोय. पुढेपुढे याची इतकी सवय होते की अकॉर्डिअन वाजू लागले की आपण मनाने आधीच सिसीलीत पोहोचतो. नंतर आपल्याला मायकल किंवा तरुण व्हिटो दिसतात.

हा पूर्ण थीमचा संच गॉडफादर व्हॉल्टझ म्हणून सुप्रसिद्ध आहे.

काही खास प्रसंग जेंव्हाचे सिन तुम्ही हे थीम ऐकलेच पाहिजे ते म्हणजे कॉनीच्या लग्नात कॉनी आणि व्हिटो यांनी केलेला डान्सचा सिन, डॉन व्हिटोवर झालेला प्राणघातक हल्ला, मायकेल चे सिसीलेतले प्रसंग विशेषतः त्याचे अपोलोनियाच्या प्रेमात पडणे (struck by a thunder bolt), सन्नीच्या मृत्युसमयीचा प्रसंग, मायकेलचे डॉन बनणे, दुसऱ्या भागात तरुण व्हिटोचे डॉन सिसीओला मारुन आपल्या आई,वडील व काकाच्या मृत्युचा बदला घेणे, मायकेलच्या आईचा मृत्यू, आपल्याच भावाला फ्रेडोला मायकलने पाण्यात बुडवून मरवणे, बायको के चे मायकेलला सोडून जाणे व हताश एकाकी मायकेल चे मागे उरणे.. सर्व प्रसंगात निना रोटाचे संगीत तुम्हाला सतत साथीला असतं..
ते संगीत आर्त आहे, भिडणारे आहे..

निना रोटाचे या संगीतामुळेच गॉडफादर हा निव्वळ माफिया मुव्ही न बनता ती एक मानवी भावनांची व एका कुटुंबाच्या अविस्मरणीय प्रवासाची आख्यायिका ठरते. आपण म्हणूनच आजही या सिनेमाशी इतक्या भावनीकरित्या जोडले जातो..अन वारंवार या अख्यायिकेकडे ओढले जातो..

निना रोटाला या थिमसाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळून परत काढले गेले. कारण यातली एक छोटी सुरावट कुठल्यातरी त्याच्याच आधीच्या सुरावटीशी मिळती होती. ‘ओरीजनल स्कोअर’ बद्दल आग्रही असणारी अकॕडमी त्याबद्दल तडजोड करणार नव्हती. त्यामुळे ज्या संगीतासाठी खरे तर निना रोटाला थेट ऑस्कर मिळायचा होता, तिथे नामांकनही मिळाले नाही.

गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी मिळूनही हे यश अधुरे राहिले..
खरेच न पटणारे आहे पण सत्य आहे..
जर डॉन व्हिटो कॉर्लिओनी ही खरी व्यक्तीरेखा असती तर..?
त्यांनी ॲ‍कॕडमीला निना रोटाला ऑस्कर द्यायला लावले असते..
तो एवढच म्हणाला असता..
‘Well..I will make them an offer they wont refuse…’
टीप :

खाली या थीमच्या काही लिंकस देत आहे

1. जगप्रसिद्ध डॕनीश नॕशनल सिंफनी ऑर्केस्ट्राने सादर केलेली ही गॉडफादर थिम ऐका. फक्त डोळे मिटून आस्वाद घ्या, निना रोटाच्या या कमाल ‘गॉडफादर व्हॉल्ट्झ’ चा. यात ट्रंपेट, ओबो, मँडोलीन आणि व्हायोलीन वर ही थीम ऐकताना तुम्हाला कोणते सीन आठवतात ते कमेंट्समधे नक्की लिहा.

2. जगप्रसिद्ध 2Cellos या जोडगळीने फक्त व्हायोलिनवर वाजवलेली गॉडफादर थिम ही नक्की ऐकायलाच हवी.

3. सुप्रसिद्ध इटालियन संगीतकार आंद्रे रियु याने इटलीतील एका कार्यक्रमात आपल्या सहकाऱ्यांसह स्वतः वाजवलेली गॉडफादर थिम एकदा ऐकायला हरकत नाही.

1 Comment on गॉडफादर(१९७२) / गॉडफादर-२(१९७४)

  1. खुपच सुंदर शब्दात आपण गाॅडफादर सिनेमा बद्दल लिहीलं आहे.
    हा चित्रपट खरच भव्य आणि अजरामर आहे.
    माझ्याकडे तिन्ही भाग आहेत.
    आणि मी वेळ मिळेल तेव्हा आणि कधीकधी वेळ काढून ते बघत असतो.
    निनो रिटा चं संगीत तर अप्रतिम आहे.
    मायकल चं पात्र मला खुप प्रभावित करतं.टाॅम हेगन, पीटर क्लेमेंझा, ममा काॅर्लिआन,फ्रँक पेंटॅंजली,सर्व व्यक्तिरेखा आपल्याशा वाटतात.
    गाॅडफादर हा एकुण दहा तासांचा सिनेमा आहे असच वाटतं. नियतीच्या खेळातील
    आपण सर्व कळसुत्री च्या बाहुल्या आहोत हाच या चित्रपटा चा संदेश आहे असे मला वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..