गोकुळीच्या आम्ही गोपिका,निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,–!!
करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,–!!
ठुमक ठुमक चालीची
नक्कल करीत थांबशी, उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!!
नको नको रे मारुस खडा,
ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा जथा,
मिळून घालता ना डांका–!
गोंडस तव रूपाला देखण्या,
नुसते आम्ही बघत राहतां,
अल्लद हे घडेही पळवतां, नवनीत सारेफस्त करतां, सांगा काय समजवावे तुम्हां,
दया कर आम्हांवर कान्हा,-!
भांडू कातुझ्याश गोविंदा* पाहता तुला,कासाविशीजीवां
सोड, वाट मनमोहना ,
कसे सांगावे नंद -यशोदा,–!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply