नवीन लेखन...

गोळवलकर गुरूजी आजही लाखोंचे प्रेरणास्थान! 

संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात.

गोळवलकर गुरूजी यांचा जन्म ०९ फेब्रुवारी १९०६ रोजी नागपूर येथे झाला. त्यांच्या कारकिर्दीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम, कुष्ठरोग निवारक संघ, सरस्वती शिशु केंद्र अशा बहुलक्षी संघटनांची कामे सुरु झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेक देशात पध्दतशीरपणे पसरविण्याचे कार्य याच जटाधारी व्यक्‍तीने केले.

गोळवलकर गुरूजींच्या बुध्दीची चुणुक त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच दिसून येते. ते ज्या नागपूरच्या प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकत होते त्या वेळेचा किस्सा तर मार्मिकच आहे. एकदा कॉलेजच्या वर्गात खिश्चन प्राचार्य गार्डीनर स्वतः बायबलचा तास घेत होते तेव्हा व्याख्यानाच-या ओघात काही उदाहरणे देत ते बायबलमधील संदर्भ सांगू लागले. इंग्रजीवर प्रभुत्व असणारे गोळवलकर उभे राहिले. ते गार्डीनर यांना अगदी नम्रपणे सांगू लागले की, “महोदय, तुम्ही सांगितलेला संदर्भ चुकीचा आहे. तुम्ही उच्चारलेली वाक्ये मी सांगतो? असे सांगून त्यांनी गार्डीनर यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. लगेच गार्डीनर यांनी बायबल उघडून गोळवलकरांचे म्हणणे तपासून पाहिले. त्यांना आपली चूक उमगली. त्यांनी भरवर्गात गोळवलकरांची प्रशंसा केली.

अनेकजण शंका व्यक्‍त करत. पण दिवाळी हा सण मुस्लिमांनी साजरा करावा तसाच ईद हा सण हिंदूनी साजरा करावा असे जेव्हा गुरुजींनी सांगितले तेव्हा मात्र संघविरोधकांनी पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले. गोळवलकर गुरूजींनी संघातीलच निवडक माणसे वेचून भारतीय जनसंघाची स्थापना केली. त-याचेच आज दुसरे रुप असलेला भारतीय जनता पक्ष सत्तेची फळे चाखत आहे. हिंदुस्थानचे बिगरकाँग्रेसी पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी सारख्या अनेक मातब्वरांची जडणघडण गोळवलकर गुरुजींच्याच काळात झाली.

संघटना वाढावी यासाठी कार्यकर्ते गोळा करताना त्यांनी कधीही जात-धर्म, श्रीमंत-गरीब याचा विचार केला नाही. अंदाजे चाळीस वर्षापूर्वीचा प्रसंग मला अजूनही चांगला आठवतो. गुरुजी ठाणे शहरात आले असता ते एकदा आमच्या घरी माझ्या वडिलांची (स्व. गजाननराव कोळी) क्षेट घेण्या-साठी आले होते. तेव्हा आम्ही चेंदणी कोळीवाड्यात राहत होतो. तेव्हा कोळीवाडा सध्याच्या एवढा व्यवस्थित नव्हता तरीसुध्दा ते कोळीवाड्यासारख्या ठिकाणी आले. त्यातही आमच्या घरी सुक्‍या मासळीचा (धंद्यासाठी) भरपूर साठा असल्या कारणाने मासळीच्या प्रचंड वासाबद्दल त्यांनी साधीशी तक्रार सुध्दा केली नाही. यावरून त्यांना कार्यकर्त्यांबद्दल असलेला आदर लक्षात येतो.संघटना वाढावी याकडे गुरूजींचे बारीक लक्ष असे. बैठकीत एखादा कार्यकर्ता आला नाही तर त्याची चौकशी ते अधिक करीत. संघटनेची वाढही माणसा-माणसांची प्रवृत्ती जाणून करायची असते याची नेमकी जाणीव त्यांना होती. ते कट्टर हिंदुत्ववादी होते म्हणूनच चार दिशेला चार तोंडे असणाऱ्या शंकराचार्यांची परिस्थिती त्यांना खटकत होती. म्हणून त्यांनी प्रचंड प्रयत्न करुन प्रत्येक शंकराचार्यांना स्वतंत्र भेटून त्यांची मने वळविली आणि एकावेळी सर्व शंकराचार्यांना एका व्यासपीठावर आणले.

हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. पण चीन बरोबर झालेल्या युध्दानंतर आलेल्या २६ जानेवारीच्या राष्ट्रीय संचलनात त्याच नेहरूंनी संघाच्या कामावर प्रभावित होऊन सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. संघानेही ते आनंदाने स्वीकारले. वैचारिक मतभेद कितीही असेल तरी राष्ट्रीय हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे या वृत्तीने ते वागले. अशाच वृत्तीने मोठे नेते वागले की इतर कार्यकर्त्यांना आपोआपच समाजजीवनाला आदर्श बनतो. असा हा संन्यासी, ज्याने आपले सारे आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले ते कर्मयोगी ५ जून १९७३ रोजी कॅन्सरसारख्या असाध्य रोगाने जग सोडून गेले. संसदिय परंपरेचा इतिहास संसदेचा सभासद नसलेल्या गोळवलकर गुरूजींना भारतीय संसदेने श्रध्दांजली वाहिली याची नोंद निश्चितच कायम राहील आणि म्हणूनच लाखोंचे ते प्रेरणास्थान ठरतील यात शंका नाही.

विद्याधर ठाणेकर
सन्मित्र १९ फेब्रु. २००१

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..