नवीन लेखन...

सुहास्य-वचने तुमच्यासाठी

हास्य हे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे. चेहर्‍यावर ओढूनताणून हसू आणता येत नाही. पण ही सुहास्यवचने आपल्याला नक्कीच हसायला लावतील..

दारुबाज नवरा त्याच्या बायकोला म्हणत असतो….. `मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.’

फॅमिली कोर्टातला वकील त्याच्या अशीलाला सांगत असतो….. `घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न’

अयशस्वी माणूस नेहमी म्हणतो …. `ज्या वेळी मला यशाची गुरुकिल्ली सापडते … तेंव्हा कुणीतरी त्याचे कुलूप बदललेले असते.’

मधूमेह (डायाबेटीस) झालेला माणूस नेहमीच म्हणतो …. `आयुष्याचा काय भरंवसा …. स्वीट डिश आधी खाऊन घ्या.. ‘

मार्केटिंगच्या क्लासमधला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो …..  `कुणाला काही पटवून देऊ शकत नसाल ……  तर त्याला गोंधळात टाका.’

आता हास्ययात्रेतील ही आणखी काही सुहास्य-वचने वाचा…

जर तुम्हाला रस्त्यातल्या सगळ्या वस्तूंचा अडथळा होत असेल …. तुम्ही चुकीचा रस्ता धरला असेल.

बोगद्याच्या टोकापाशी दिसणारा उजेड ….. समोरुन येत असलेल्या गाडीच्या दिव्याचाही असू शकतो.

गालातल्या गालात हसून घ्या ……  का हसताय याचा विचार करण्यात लोकांचा गोंधळ उडेल.

तुम्ही जमीनीवर दोन्ही पाय घट्ट रोवून उभे रहाल तर ……. पँट कशी घालाल?

तुम्ही वेळेवर पोचाल …… ते पहायला तिथे कोणीच असणार नाही.

कड्यावरून कोसळत असतांना कोणाचा जीव जात नाही …. खाली गेल्यावर अचानकपणे पडणे थांबते तेंव्हा जीव गेलेला असतो……

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..