हे माहित नसलं तरी काही बिघडत नाही, आणि माहित असून नुकसानही होत नाही..
Google..
ही छोटीशी कथा आहे ‘Google’ या आपल्या दैनंदिन जीवनात देवानंतरचं महत्व असलेल्या आपल्या जा(ज्ञा)नी दोस्ताची..
सर्वात लोकप्रिय इंटरनेट सर्च इंजीनला ‘गुगल’ हे नांव केवळ एका शुल्लक स्पेलिंग मिस्टेकमुळे मिळालं त्याची..
खरंतर गुगलच्या जन्मदात्यांना त्यांच्या सर्च इंजनचं नांव ‘Googol’ असं ठेवायचं होतं. ‘गुगाॅल’ या शब्दाचा अर्थ आहे 10 चा १००वा घात..!! म्हणजे १ या संख्येवर शंभर शुन्य दिल्यानर जी संख्या येईल ती ‘गुगाॅल’..!! गुगलचं कार्य असंच आहे हे त्यांना दर्शवायचं होतं आणि ते तस्सच असल्याचा आपला अनुभव आहे..
मात्र नांवाचं रजिस्ट्रेशन करताना गुगाॅल हे नांव अगोदरच रजिस्टर असल्याचं लक्षात आलं अन् मग स्पेलिंगची दुसरी माॅडणी करून ‘Googol’ ऐवजी ‘Google’ असं नांव नोंदलं गेलं आणि या नांवाने जो इतिहास घडवला तो आपल्यासमोर आहे, त्याच्याशिवाय रोजचं जगणं अशक्य आहे असं म्टलं तरी चालेल नाही का?
ही लोकप्रियता ‘गुगाॅल’ या नांवाला मिळाली असती का हा संशोधनाचा विषय आहे..!
नांवात बरच काही असतं बरं का..!!
– – नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश
Leave a Reply