बेळगाव येथे असतांना गोविंद बल्लाळ देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ चा. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले.
मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले. तेव्हांच त्यांचा उत्तम नट म्हणून लौकिक झाला. कांहीं दिवस सरकारी नोकरी केल्यानंतर ती कायमची सोडून ते नाटयवाङ्मयांत भर घालूं लागले. किर्लोस्करांच्या खालोखाल नाटयकवि म्हणून यांचें नांव पुढें येऊन ब-याच नाटक मंडळ्यांनां यांच्या नाटकांवर गबर होतां आलें. देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत दुर्गा मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे. यांपैकीं पहिलीं तीन संस्कृत नाटकांचीं व शेवटलीं इंग्रजी नाटकांचीं रूपांतरें होत.
शारदा नाटक कायतें एकच त्यांचें स्वत:चें व तत्कालीन समाजांत क्रांति करून सोडणारें नाटक होतें जरठ तरुणी विवाह हा या नाटकाचा सामाजिक विषय असून नाटककारानें आपल्या कवित्वानें तो उत्कृष्ठ रंगविला आहे. त्यामुळें बराच काळ महाराष्ट्रीयांच्या मनावर याचा पगडा बसला होता. गोविंद बल्लाळ देवल यांचे १४ जून १९१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply