सोळाव्या शतकात पोर्तूगिजांनी त्या काळच्या गोव्याच्या १३४ गावातील हजारभर देवळे नेस्तनाबूत केली. या देवळात सेवा देणारे पुजारी, पुराणिक, अभिषेकी या भटांना (पुरोहितांना) गोव्यातून हाकलून लावले. त्याकाळी या भटांच्या ताब्यात उत्पन घेऊन निर्वाहासाठी दिलेल्या देवतेच्या मालकीची चांगल पिक देणीरी जमीन/बागायती होती. या सर्व जमीन बागायती चर्चला दिल्या गेल्या. हिंदू धार्मिक कार्य करण्यीस बंदी केली. पूण पुढे सतराव्या शतकात सरकारास पैशांची चणचण भासू लागली.
पोर्तूगिज सरकारान घरातल्या घरान हिंदू धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. पण पुरोहित आणायचा नाही आणि इन्क्विजिशन अधिकारी हजर असायला पाहिजे तसेच हजार इश्कूद फि द्यायची असे नियम लावले.
गरजेपोटी काही बामण (गोव्यातील मास/मासे खाणारे ब्राह्मण ) धार्मिक शिक्षण शिकले. आणि गोव्यात बामणभट तयार झाले. पुढे तीन शतके हिंदू घरातल्या घरात बामण भटाकडून धार्मिक कार्य करू लागले. १९१० मधे जेव्हा पोर्तूगिज रिपब्लिक झाले, पोर्तूगालात म्हणजेच गोव्यात लोकशीय आली तेव्हापासून भटाक पुरोहिताक गोव्यात आणून धार्मिक कार्य करण्यास सुरवात झाली. गोवा हिंदू असोसिएशन स्मरणिकेत लिहिलेल्या प्रमाणे १९२५ वर्षी बामणानी ठराव घेऊन गोव्यात काही देवळात चित्पावनी भटांक रूजू केले.
त्याकाळी गोव्यात शेठ/सोनारापैकी काहीजण भटपण शिकले आनी शेठभट/सोनारभटही तयार झाले.
श्रीकांत बर्वे
Leave a Reply