काही खेडेगाव कायमस्वरूपी स्वच्छ झालेली आहेत, तर आजही काही खेडेगावात 20% च्या आसपास लोक उगड्यावर संडासला बसत आहेत. ज्या खेड्यातले थोडेही लोक रस्त्यावर संडासला बसतात, हा तेथील सुशिक्षित लोकांचाच अपमान आहे, असे मला वाटते कारण उगड्यावर बसणाऱ्यांंना मानपान, ज्ञान मुळातच नसते, त्यामुळेच हा अपमान अशिक्षीतांचा नसून सुशिक्षितांंचाच आहे असे वाटते.
स्वच्छता ही प्रत्येक माणवाला अवडणारी आहे. रस्त्याला एक जरी व्यक्ती संडासला बसली आसली तरी त्या रस्त्यावरुन ग्रहीत धरु की सकाळी 500 माणसे गेली व तेवढीच सायंकाळी वापस आली तर निदान 1000 डोक्यांना त्रास झाला. माणवी विष्ठा कोणालाही पाहावी वाटत नसताना पाहावी लागल्यास
– अशा प्रकारच्या त्रासातून आलेल्या डोक्यातून विशेष चांगल्या कामाची अपेक्षा कशी करायची? शिवाय प्राण्यांच्या पायाला ती विष्ठा लागुन अनेक घरापर्यंत ती विष्ठा पोहचणार. मच्छरांची निर्मिती जास्त होणार, हवा सुध्दा प्रदुषित होणार.. आपण स्वत: हा कितीही स्वच्छ गल्लीत राहात आसलो तरी मच्छर एका तासात दिड मैला पर्यंत उडून जाऊ शकते, त्यामुळे एकही व्यक्ती उघड्यावर बसणार नाही या संबंधी जागृत करण्याची जबाबदारी सुशिक्षित लोकांची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
* यासाठी सुशिक्षितांनी पुढाकार घेऊन लाऊडस्पीकर च्या माध्यमातून वारंवार सुचना देऊन एकेदिवशी गावात स्वच्छता अभियान राबवायचे त्यामध्ये तरुण, विद्यार्थी, स्त्रियांचा सुद्धा सहभाग घ्यायचा खपटांच्या सहाय्याने मानवी विष्ठा म्हणजेच संडास उचलून सारे रस्ते चकाचक करावे. हागणदारी च्या ठिकाणी बल्ब लावावेत.
* पाण्याअभावी किंवा सवयीने ज्या माणसांना उगड्यावर जावेच लागते, त्यांनी शेतात जाऊन विष्ठेवर किंवा संडासवर माती टाकावी, म्हणजे रोगप्रसार टळून संडासचे खत तयार होईल.
* सर्वांंचे मने प्रसंन्न होऊन गावात एकी होते व गावाच्या ईतर समस्या सोडविण्यासाठी डोके कामाला लागतात.
* गाव स्वच्छ राहिल्यामुळे एखाद्या व्यक्तीचाच फायदा नसतो तर संपूर्ण गावाचाच फायदा असतो.
* हागणदारीमुक्त गावाचे शेजारी गावाकडून कौतुक होईल व गाव आरोग्य संपन्न होईल.
* उगड्यावर संडासला बसणे हा गुन्हा आहे, लाऊडस्पीकरवरुन निदान महिनाभर तरी पुन्हा पुन्हा सांगून लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे, उगड्यावर संडासला बसणाऱ्याच्या घरी जाऊन तुमचे नावे पोलिसांना कळविले जातील अशी माहिती स्थानिक प्रमुख मंडळींनी त्यांना द्यावी, त्यांच्या काही आडचणी असल्यास तात्काळ सोडवाव्यात.
— राजीव तिडके
स्वच्छता दुत
मुख्याध्यापक
जि. प. प्रा. प्राथमिक शाळा कंधार
ता. कंधार जि. नांदेड
“मराठीसृष्टी”च्या फेसबुक पेजवरुन
Leave a Reply