केविन वॉर्वींक याला मी भेटलो आहे त्याचे लेक्चर ऐकले असून एक भन्नाट शास्त्रज्ञ असून माणसापेक्षा यंत्र श्रेष्ठ आहे असे म्हणतो… त्याने काय शोध लावले ते जरा वाचा, वाटल्यास गुगलवर सर्च करून बघा..
२०५० पर्यंत माणूस आपल्या विचारशक्तीवर गाडी चालवू शकेल. त्याला हाताने गाडी चालवावी लागणार नाही. टेलिफोन किवा मोबाईलचा वापर न करता तो बोलू शकेल, एकमेकांचे बोलणे एकमेकांना समजू शकेल. भावना आणि सतत कुठल्याही गोष्टीमध्ये चर्चा करणाऱ्या आम्हा भारतीय लोकांना हे म्हणजे फार घातक वाटेल. पण संशोधन हे संशोधन असते. शास्त्रज्ञ शोध लावतो. तो सगळ्यांसाठी .
समोरच थोडासा साधा पटकन मिसळणारा केवीन वोर्विक उभा होता. आत्ता तो 65 वर्षाचा आहे , मी त्याला भेटलो तेव्हा तो पन्नाशीचा असावा पण कुठलेही अवडंबर न माजवता तो गप्पा मारू लागला. तो ठामपणे म्हणत होता माणसापेक्षा मशीन श्रेष्ठच आहे आम्हा मानवतावादी लोकांना निश्चित ते खटकणारे होते. पण तो कुणाचीच पर्वा करता तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. खरेच हे शक्य आहे का ? असा मनात विचार आला आणि मला आपली जुनी टेलिपथी हे संकल्पना आठवली मी सावधपणे आईकू लागलो. परंतु त्याला विज्ञानाचा आधार नाही कदाचित टेलिपथी हा योगायोगही असू शकतो.
केवीन हा जगातील पहिला ‘ सायबर रोबो ‘ होता. आणि त्याला मी अगदी जवळून बघत होतो , आईकत होतो. तो सध्या यु.के.मध्ये शिकवत आहे, तो म्हणाला ‘ यत्रामुळे मला भविष्यात डोकावता आले . ती माणसापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत याचा मी अनुभव घेतला आहे.’ ह्या विधानाने भावनाचे स्तोम माजवणार्या आपल्याला निश्चित धक्का बसला असणार यात शंका नाही. काहीजण टीकाही करतील , पण त्याला काही त्याची परवा नाही. केवीनने आपल्या हातात मायक्रोचीप घालून घेतली, आणि याचा नऊ दिवस अनुभव घेतला. तो घरात जाऊ लागला की घराचे दरवाजे आपोआप उघडत,दिवे लागत,कॉम्पुटर चालू होत असे , त्याने जेव्हा ती चीप काढली परंतु अनवधानाने ती कुणाच्यातरी हातातून जमीनीवर पडली तेव्हा थोडासा ब्लास्ट झाला तेव्हा केवीन हादरला होता. तो म्हणतो मानवी प्रज्ञा अजून दहा मितीत असणारे विश्व पाहू शकत नाही. ती तीन-चार मितीत विश्व पाहू शकते. तेव्हा यंत्राच्या सहाय्याने माणूस अधिक ताकतवान होऊ शकतो. हल्ली यंत्राला बुद्धिमत्ता असते का याबद्दल कोणेही वाद घालत नाहीत. परंतु आमच्या शाळामध्ये मुर्खासारखे निबंधाचे विषय असतात उदाहरण द्यायचे झाले तर ‘ यंत्र शाप की वरदान ‘ असा विषय देतात यात शिक्षकांचा आणि पाठ्यपुस्तक करणार्यांचा दरिद्रीपणा दिसून येतो. मार्क मिळवायचे म्हणून शिक्षक आणी मुले रट्टा मारतात.
पर्किन्स हा बरा न होणारा आजार आहे. त्याच्यावर मेडीसीनचा फारसा उपयोग होत नाही. परंतु मेंदूत मायक्रोचीप लावून त्या माणसाला नॉर्मल करता येते हे त्याने एका विडीओद्वारे दाखवले . आणि नुकतेच वाचनात आले की ह्याचा उपपोग करणे सुरु झाले आहे. जर विज्ञानाच्या सहाय्याने माणूस अमर झाला तर काय होईल . जेव्हा माणूस प्रयोगशाळेत रक्त बनवेल तेव्हा हे शक्य होईल असे म्हटले जाते आणि आता मानवाने ‘ कृत्रिम रक्त ‘ देखील बनवले आहे जेणेकरून एड्स किवा अन्य रोगावर नियंत्रण करता येईल. ‘ टर्मिनेटर ‘ सारखे चित्रपट बघतो ते कदाचित संपूर्णपणे वास्तवात यायला खूप वर्षे लागतील , पण त्याची झलक मात्र दिसू लागली आहे.
मला आठवतय माझ्या घरी ऑलिव्हर ब्लाक्वेल आला होता , माझ्या मुलाच्या मित्राच्या ओळखीचा होता त्याने तर जगातले पहिले पेनलेस इनजेक्शन बनवले होते. तो इंग्लंडमध्ये रहातो , तरुण होता पण कमालीचा साधा. तसाच केवीन मला दिसला. दिसण्यापेक्षा असणे फार महत्वाचे असते हे मला त्यावेळी जाणवले होते.
केवीन म्हण्तो असा हा सायबोर्ग होणे म्हणजे मानवी उत्क्रांतीमधील पुढील टप्पा आहे. तो म्हणतो माणसाच्या मेंदूची क्षमता झपाट्याने झाली परंतु मानवाची अवयवांची क्षमता जवळजवळ आहे तशीच आहे. केवीनने एक टोपी आणली होती. सिंझोफेनिया झालेला माणूस सायबोर्गच्या सहाय्याने गाडी चालवण्या इतका बरा करण्यात येऊ शकतो असे तो म्हणाला. सायबोर्गच्या सहाय्याने काहीही शक्य आहे. कदाचित आपल्या भाव-भावना चेतवणे किवा स्मृती जगवणे शक्य आहे. माणूस आणि तंत्रयुक्त माणूस यामध्ये तंत्रयुक्त माणूस आघाडीवर राहील , आणि माणसाची किमत शेळ्या-मेंढ्या प्रमाणे एक दिवस होईल आणि हे कोणीही अडवू शकणार नाही.
याला आपल्याला सामोरे जावे लागेलच. मी जरा वेळ त्यच्याशी बोललो त्याची स्वाक्षरी घेतले , मी त्याला माझ्या मुलाच्या संशोधनाबद्दल जेव्हा सागितले तेव्हा त्याचे नाव ‘ करण ‘ असे लिहून स्वाक्षरी केली.
मनात विचार आला अशी माणसे बघणे फार महत्वाचे आहे कारण ती खरोखर ‘ अमरच ‘ आहेत.
— सतीश चाफेकर
Leave a Reply